For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सात्विक-चिराग मानांकनात तिसऱ्या स्थानी

06:22 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
सात्विक चिराग मानांकनात तिसऱ्या स्थानी
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या ताज्या मानांकन यादीत पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी आपले पूर्वीचे अग्रस्थान गमविले असून आता ही जोडी दुहेरीच्या मानांकनात तिसऱ्या स्थानावर आहे.

पुरुष दुहेरीच्या ताज्या मानांकनात चीनच्या केंग आणि चेंग या जोडीने पहिले स्थान मिळविले असून डेन्मार्कच्या अॅस्ट्रुप आणि रेसमुसेन यांनी दुसरे स्थान पटकाविले आहे. सात्विक आणि चिराग यांची दुहेरीच्या मानांकनात दोन अंकांनी घसरण झाली आहे. गेल्या महिन्यात सात्विक आणि चिराग यांनी थायलंड स्पर्धेत दुहेरीचे जेतेपद मिळवून मानांकनात अग्रस्थान हस्तगत केले होते. त्यानंतर या भारतीय जोडीने ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. पुरुष एकेरीच्या ताज्या मानांकन यादीत भारताचे एच. एस. प्रणॉय 10 व्या तर लक्ष्य सेन 14 व्या स्थानावर आहेत. किदांबी श्रीकांत 32 व्या, प्रियांशु राजवत 34 व्या आणि किरण जॉर्ज 35 व्या स्थानावर आहेत. महिला एकेरीच्या मानांकनात पीव्ही सिंधू 10 व्या स्थानावर आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.