Solapur Youth Suicide सोलापूर : शहरातील तरुणाने गळफास घेत स्वत:ला संपवलं, चिठ्ठीत दिलं कारण
09:35 PM Jun 24, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
सोलापूर : शहरातील उमा नगरीमध्ये राहणाऱ्या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २२ जून रोजी रात्री घडली. अजिंक्य सुरेश हांगरगेकर (वय ३९, रा. जवाहर गल्ली, ता. तुळजापूर, जि. धाराशिव, सध्या रा. उमा नगरी हनुमान मंदिराजवळ, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.
Advertisement
२२ जून रोजी सायंकाळी राहत्या घरी किचनमध्ये अजिंक्य हांगरगेकर यांनी छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने अज्ञात कारणावरून गळफास घेतला. त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत सिव्हिल पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे. अजिंक्य यांनी चिठ्ठी लिहून गळफास घेत आत्महत्या केली असून चिठ्ठीमध्ये तणावात असल्याबाबतचा उल्लेख करण्यात आलेला आहे, असे फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी सांगितले.
Advertisement
Advertisement