For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News | वि. वा. शिरवाडकर जयंतीनिमित्त तरुण भारत खजानातील ३९ हस्ताक्षरे प्रदर्शनात

01:43 PM Feb 27, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   वि  वा  शिरवाडकर जयंतीनिमित्त तरुण भारत खजानातील ३९  हस्ताक्षरे प्रदर्शनात
Advertisement

            उंब्रज महाविद्यालयात वि. वा. शिरवाडकर जयंतीनिमित्त हस्ताक्षर प्रदर्शन

Advertisement

उंब्रज - उंब्रज ता. कराड येथील सौ. मंगलताई रामचंद्र जगताप महाविद्यलयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंती निमित्ताने मराठी भाषा गौरव दिन साजरा केला गेला. या दिनाचे औचित्य साधून हस्ताक्षर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनात तरुण भारतच्या खजाना पुरवणीतील ३९ मराठी लेखक,कवी आणि कलावंतांची हस्ताक्षरे मांडण्यात आली होती. यांचे संकलन मा. बालमुकुंद पतकी यांनी केले आहे.

कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेतील निवृत्त प्राचार्य सुरेश घुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र, उंब्रजचे शाखाधिकारी यशवंत सोनवणे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. मनोहर माळगे यांच्या हस्ते वि. वा. शिरवाडकर-कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपप्राचार्य प्रा. मनोहर माळगे यांनी स्वागत केले. सुरेश घुटे म्हणाले, विद्यार्थी दशेत असताना आणि नंतरच्या जीवनात देखील प्रचंड वाचन केले पाहिजे. मराठी भाषा आपल्या प्रत्येक व्यवहारात वापरली पाहिजे. मराठी भाषा आणि आपल्या प्रत्येकाच नातं आई-मुलासारखं आहे. मराठी भाषेच्या प्रगतीसाठी आणि प्रसारासाठी अधिक चांगले प्रयत्न केले पाहिजेत. यशवंत सोनवणे यांनी महाविद्यालयातील हस्ताक्षर प्रदर्शनाचे कौतुक करून मराठी भाषेच्या प्रचारासाठी अधिकाधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत असा आशावाद व्यक्त केला.

Advertisement

विद्यार्थ्यांनी दैनंदिन अभ्यासासोबतच अवांतर वाचन देखील केले पाहिजे आणि त्यातूनच उद्याचा सक्षम आणि कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडेल असे मत महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. मनोहर माळगे यांनी व्यक्त केले.

हस्ताक्षर प्रदर्शन कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. विकास बर्गे यांनी केले. तर आभार डॉ. डी. बी. भोगे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रा. प्रविण जाधव, प्रा. मारुती तांबे, प्रा. व्ही. पी. पाटील, प्रा. टी. एस. नाईक, प्रा. पी. एस. पाटणे सौ.सुवर्णा मुळगावकर मॅडम, प्रा. माया जाधव, प्रा. पल्लवी देसाई, प्रा. माधुरी साळुंखे, प्रा भाग्यश्री साबळे आणि प्रा. पी. जे गुरव उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.