For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी रेल्वे स्टेशन रेल हॉटेल आणि नव्या प्लॅटफॉर्मसाठी 39 कोटींचा आराखडा

04:17 PM Feb 12, 2025 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी रेल्वे स्टेशन रेल हॉटेल आणि नव्या प्लॅटफॉर्मसाठी 39 कोटींचा आराखडा
Advertisement

आमदार दीपक केसरकर यांची माहिती

Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी

सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर रत्नसिंधू योजनेतून रेल हॉटेल व छोटे निवासी रूम तसेच नव्या प्लॅटफॉर्मसाठी जवळपास 39 कोटी रुपये खर्चाच्या कामाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच या ठिकाणी रेल हॉटेल्स व रूम उभारण्यात येणार असून तिलारी धरणाचे पाणी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला देण्याची निविदा प्रक्रिया ही राबवण्यात येणार असल्याची माहिती रत्नसिंधू योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सावंतवाडी- मळगाव रेल्वे टर्मिनस या ठिकाणी दर्जेदार असे रेल हॉटेल व तुतारी रेल्वे रुळाच्या बाजूला नवे प्लॅटफॉर्म आणि छोट्या निवासी रूमची व्यवस्था करण्यासाठी नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. या जागेची पाहणी आज श्री केसरकर यांनी केली. यावेळी त्यांनी जवळपास दोन तास सावंतवाडी मळगाव रेल्वे टर्मिनसच्या जागेची पाहणी केली. आणि तुतारी एक्सप्रेसमध्ये बसून नवीन आराखड्याची चर्चा केली यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, स्टेशन मास्टर कृष्णकांत परब , रेल्वेचे जे पी प्रकाश, श्री ए बी फुले, सुरज परब, सुनील परब ,श्री गाड , योगेश तेली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वैभव सगरे आदी उपस्थित होते .

Advertisement

Advertisement
Tags :

.