महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोव्यात यावर्षी 38 हजार कोटींचे डिजिटल व्यवहार

11:57 AM Dec 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांची माहिती

Advertisement

पणजी : गोव्यात 2022-23 या आर्थिक वर्षात सुमारे रु. 38 हजार कोटींचे डिजिटल (ऑनलाईन) व्यवहार झाले आहेत. केंद्रीय आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी संसदेत सदर माहिती लेखी उत्तरातून दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गोवा राज्यात डिजिटल व्यवहारात वाढ होत असल्याचे समोर आले आहे. वर्ष 2018-19 मध्ये रु. 5 हजार कोटी, वर्ष 2019-20 मध्ये रु. 9 हजार कोटी, वर्ष 2020-21 मध्ये रु. 13 हजार कोटी तर 2021-22 मध्ये रु.24 हजार कोटींचे व्यवहार झाल्याचे त्यांनी लेखी उत्तरातून म्हटले आहे. डिजिटल व्यवहार करणे सोपे जात असून आता बहुतेक लोक त्याच्याकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. त्या व्यवहारात एटीएम डेबीट कार्ट, क्रेडीट कार्ड, रुपे कार्ड, भीम युपीआय, गुगल पे, आयएमपीएस, युएसएसडी असे विविध पर्याय त्यासाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकजण आपल्या पसंतीच्या पर्यायाने डिजिटल व्यवहारात पुढे येत आहेत. रोखीने तसेच पैसे सांभाळण्यापेक्षा डिजिटल व्यवहार सोयीचे असल्याने त्याकडे वळत आहेत. मोठे मॉल, दुकाने, हॉटेल्स तसेच अनेक लहान विक्रेत्यांकडेही आता ऑनलाईन पैसे भरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे हा व्यवहार वाढत चालल्याचे समोर येत आहे. गेल्या 4 ते 5 वर्षात डिजिटल व्यवहार 8 पटीने वाढले आहेत आणि याही पुढे ते वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article