महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तालुक्यात 38 कि. मी. मानवी साखळी

06:52 AM Sep 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विद्यार्थी, ग्रामस्थांचा सहभाग : तहसीलदार-तालुका पंचायतीकडून तयारी

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

लोकशाहीचे महत्त्व आणि मानवी हक्कांची जाणीव करून देण्यासाठी रविवारी बेळगाव तालुका क्षेत्रात तब्बल 38 कि. मी. मानवी साखळी निर्माण केली जाणार आहे. यामध्ये नागरिक, ग्रा. पं. सदस्य आणि शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे. यासंबंधी 57 ग्राम पंचायतमधील पीडीओ, ग्रा. पं. अध्यक्ष, सदस्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त राज्यात तब्बल 2600 कि. मी. मानवी साखळी निर्माण केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून बेळगाव तालुक्यातही 38 कि. मी. मानवी साखळी निर्माण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. करडीगुद्दी ते शिंदोळी क्रॉस 12 कि. मी., शिंदोळी क्रॉस ते सुवर्णविधानसौध 12 कि. मी. आणि सुवर्णविधानसौध ते मुत्नाळ 14 कि. मी. चा या मानवी साखळीत समावेश राहणार आहे.

तहसीलदार आणि तालुका पंचायतच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी मानवी साखळी निर्माण करणाऱ्या रस्त्याला भेट देऊन पाहणी केली. सकाळी 9 वाजता मानवी साखळीला प्रारंभ होऊन 10.30 वाजता सांगता होणार आहे. विशेषत: या मानवी साखळीचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रण होणार आहे. या मानवी साखळीसाठी 57 ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील प्रत्येक ग्रा. पं. सदस्याला 100 जणांना उपस्थित करण्याचे आवाहन केले आहे. एक कि. मी. अंतरावर एक हजारजण थांबणार आहेत. यामध्ये सरकारी कर्मचारी, विद्यार्थी, संघ-संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आदींचा समावेश राहणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article