For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्यकालीन पुस्तकांमध्ये 3700 वर्षे जुना व्हायरस

06:19 AM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
मध्यकालीन पुस्तकांमध्ये 3700 वर्षे जुना व्हायरस
Advertisement

व्हायरसमुळे 5 लाख प्राण्यांचा झाला होता मृत्यू

Advertisement

वैज्ञानिकांनी युरोपमधील जुन्या धार्मिक पुस्तके आणि पांडुलिपींमध्ये एक धोकादायक व्हायरसचा डीएनए शोधला आहे. हा व्हायरस शीपपॉक्स असून जो मेंढ्यांना संक्रमित करतो. शतकांपूर्वी हा व्हायरस पूर्ण कळपालाच नष्ट करत होता. डब्लिन विद्यापीठाच्या आनुवांशियक प्रयोगशाळेतील संशोधक लुई लोते यांच्या नेतृत्वात संशोधकांनी यॉर्क गॉस्पल्स यासारख्या प्रसिद्ध पांडुलिपींचे नमुने मिळविले, ज्यात व्हायरसचे अवशेष मिळाले आहेत.

व्हायरसचे प्रमाण अंतर्गत हिस्स्यात अधिक होते. यातून आजारी मेंढ्यांच्या कातड्यापासून तयार करण्यात आलेली ही पानं असल्याचे संशोधकांना कळले आहे. मध्यकाळात आजारी प्राण्यांवर जादूटोणा करण्यात आल्याचे लोकांना वाटायचे, परंतु प्रत्यक्षात हे सुक्ष्मजीवांचे काम होते. संशोधक टीमने केवळ मध्यकालीन दस्तऐवजांपर्यंत मर्यादित न राहता कांस्य युगाच्या मेंढ्यांच्या दातांचेही विश्लेषण केले. हे दात यूरेशियन स्टेपी आणि सायबेरियनच्या अल्ताई पर्वतांमध्ये मिळाले होते. यामुळे व्हायरसचा इतिहास 3700 वर्षे मागे गेला. हे अध्ययन सायन्स अॅडव्हान्सेसमध्ये प्रकाशित झाले आहे.

Advertisement

शीपपॉक्सची महामारी सर्वप्रथम कॉकेशस आणि पूर्व युरोपीय स्टेपीच्या समुदायांमध्ये फैलावल्याचे वैज्ञानिकांचे मानणे आहे. या भागांमध्ये लोक लोकर, मांस, दूध आणि कातड्यांवर निर्भर होते. व्यापार आणि कळपांमुळे व्हायरस दूरपर्यंत फैलावला, कांस्य युगातच पाळीव मेंढ्यांचे कळप यामुळे ग्रस्त झाले होते. त्याचवेळी प्लेगचा बॅक्टेरिया देखील मेंढ्यांमध्ये आढळून आला होता. ज्यातून लोकांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागत होते हे कळते.

रोगाची लक्षणे अन् ऐतिहासिक प्रभाव

शीपपॉक्स व्हायरस माणसांच्या चेचक व्हायरसशी जवळचा संबंध राखून आहे. हा कॅप्रिपॉक्सव्हायरस परिवाराचा सदस्य आहे. संक्रमित मेंढ्यांमध्ये ताप, भूक न लागणे, डोळ्यांमधून पाणी येणे आणि लोकर नसलेल्या ठिकाणी घाव तयार होणे, तोंड, श्वासनलिका, फुफ्फुसं, पचन अन् मूत्रप्रणालीही प्रभावित व्हायची. व्हायरस वेगाने फैलावत होता, ज्या कळपांमध्ये पूर्वी हा रोग पोहोचला नव्हता, त्यात 75 ते 90 टक्के प्राणी मरू शकत होते.

उर्वरित प्राण्यांमध्ये दूध, लोकर आणि मांसाचे उत्पादन घटत होते, कातड्यावर डाग पडायचे, ज्यामुळे चामड्याची गुणवत्ता प्रभावित व्हायची. रोमन लेखक लुसियस कोलुमेला यांनी पहिल्या शतकात या रोगाचा उल्लेख केला होता. मध्यकालीन हिशेब पुस्तके आणि कृषीशी निगडित जुन्या पुस्तकांमध्ये याला पॉक्स किंवा वेरियोला म्हटले गेले. जेव्हा हा रोग दीर्घ कालावधीनंतर परतायचा, लोक त्यालान वा आणि अज्ञात आजार समजत होते. शीपपॉक्स कधीच पूर्णपणे संपुष्टात आला नाही. लसी उपलब्ध झाल्यावरही हा वेळोवेळी डोकं वर काढत असतो. अलिकडेच ग्रीसमध्ये जवळपास 5 लाख प्राण्यांचा जीव यामुळे गेला आहे. यामुळे तेथील पनीर उद्योगाला मोठा धोका निर्माण झाला आहे. प्राचीन व्हायरस आजही आर्थिक नुकसान पोहोचवू शकतात याची आठवण ही घटना करून देते.

मध्यकाळात युरोपीय समाजांसाठी मेंढ्यांमधील संक्रमण सामान्य आव्हान होते. चामड्यावर आधारित दस्तऐवजांमध्ये व्हायरसचे अनेक जीनोम मिळाले, जे त्या काळातील व्यापक समस्या दर्शवितात. हे अध्ययन केवळ व्हायरसच्या विकासाला समजून घेण्यास मदत करणार नसून पशुपालनाच्या इतिहासावरही नवा प्रकाश पाडणार आहे. कांस्य युगापासून मध्य काळापर्यंतचा प्रवास पाळीव प्राण्यांसोबत रोग केसे फैलावले हे दर्शवितो, स्टेपी क्षेत्राच्या व्यापार मार्गांनी संक्रमणाला बळ पुरविले असण्याची शक्यता आहे.

आजच्या काळात हवामान बदल, व्यापार आणि पशुवाहतुकीतून असे रोग पुन्हा फैलावू शकतात, या प्राचीन नमुन्यांमुळे समज वाढली असून आधुनिक लसी आणि नियंत्रण उपायांना प्रभावी करण्यास सहाय्य मिळू शकते असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. मध्यकालीन पुस्तके जी धार्मिक ज्ञानाचा स्रोत होती, आता आजाराच्या इतिहासाच्या दस्तऐवज ठरली आहेत. जुन्या वस्तू केवळ संस्कृती नव्हते, तर आरोग्य आणि विज्ञानाची महत्त्वपूर्ण माहितीही दडवून असतात हे या शोधातून सिद्ध होते.

Advertisement
Tags :

.