For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : विद्यार्थ्यांनी ध्येय साध्य करावे : पाटील

04:38 PM Feb 28, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   विद्यार्थ्यांनी ध्येय साध्य करावे   पाटील
Advertisement

राजारामबापू पाटील माध्यमिक विद्यालयात गुणवंतांचा सत्कार

Advertisement

मांगले : इयत्ता आठवीसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा घेतली जाते.सन २०२५-२६ मध्ये राजारामबापू पाटील माध्यमिक विद्यालय मांगले या विद्यालयातील ४४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते.

त्यापैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी शाळेच्यावतीने त्यांचा सत्कार घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिराळा पंचायत समितीचे सदस्य मोहन पाटील हे होते.

Advertisement

त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन करून आपले ध्येय साध्य करावे. ग्रामीण भागातच खरी गुणवत्ता आहे हे अनेक स्पर्धा परीश्नांच्या निकालावरून वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जेवढ्या जास्तीत जास्त शैक्षणिक सुविधा देता येतील त्या देण्याचा प्रयत्न पंचायत समितीच्या माध्यमातून करणार आहे. 

एनएमएमएस या परीक्षेसाठी आमच्या शाळेतील ४४ विद्यार्थी बसले होते.त्यातील ३७ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. ही शाळेच्या गुणवत्तेची पोचपावती आहे.विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामध्ये संस्थेच्या सर्व घटकाचे मोलाचे योगदान आहे.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार भगवान शेवडे उपस्थित होते.याप्रसंगी संदीप तडाखे (संचालक विश्वास सहकारी साखर कारखाना,चिखली), मांगले ग्रामपंचायत सदस्य अक्षय पाटील उपस्थित होते.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.एनएमएमएस परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सौ.पी.व्ही. पाटील, सौ.आर. यु.बच्चे, सौ.अनिता जाफळेकर, संस्था प्रतिनिधी, सौ.तेजस्विनी पाटील, पी.आर पाटील, बाबासाहेब पवार, अजित पाटील, विनायक तडाखे, शैलजा पाटील, मधुरा पाटील, ओंकार शिंदे या शिक्षकांचे नियमित मार्गदर्शन लाभले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.अनिता जाफळेकर यांनी केले. तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.व्ही.पाटील यांनी मानले.

Advertisement
Tags :

.