For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लीड कागदावर 37; प्रत्यक्षात 100 रुपये भाडे आकारणी

07:46 AM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
लीड कागदावर 37  प्रत्यक्षात 100 रुपये भाडे आकारणी
Advertisement

शहरातील ऑटो मीटरबाबत जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्षच

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगावमध्ये ऑटो रिक्षांसाठी मीटर आधारित भाडे प्रणाली केवळ कागदावरच राहिली आहे. प्रवासी आणि चालक या दोघांनाही भाडे फायदेशीर ठरावे यासाठी मीटर प्रणालीची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. परंतु मीटरप्रमाणे भाडे आकारणी ही निव्वळ घोषणाच ठरत असल्याने प्रवाशांना मनमानी भाडेवाढीला बळी पडावे लागत आहे.

Advertisement

अॅप आधारित सेवा पुरविणाऱ्या ऑटो चालकांना विरोध करणे तसेच मीटर बसविण्यासही असमर्थतता दर्शविणे अशी भूमिका काही ऑटो चालकांची असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. जिल्हा प्रशासनाकडून मीटरबाबत कठोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक होते. परंतु तसे होताना दिसत नाही.

बेळगाव शहरात 10 हजारहून अधिक रिक्षा धावतात. या परवानाधारक रिक्षा असल्या तरी उर्वरित परवाना नसलेल्या रिक्षाही प्रवासी भाडे घेत असल्याचे समोर येत आहे. विशेषत: रात्रीच्यावेळी मध्यवर्ती बसस्थानक व रेल्वे स्टेशन परिसरात अशा रिक्षा फिरत असल्याची तक्रार यापूर्वीही करण्यात आली आहे. जुलैमध्ये झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पुढील 15 दिवसांत मीटरद्वारे भाडे आकारणी सुरू होईल, असे स्पष्ट केले होते. पहिल्या 1.6 किलोमीटरसाठी 37 रुपये आणि त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 15 रुपये दर निश्चित करण्यात आला होता.

दोन ते तीन महिने होत आले तरी अद्याप याची अंमलबजावणी तर झालीच नाही. तसेच 1.6 कि. मी. अंतरासाठी 100 ते 150 रुपये आकारले जात आहेत. वर्दळ कमी असताना हे भाडे अजून वाढविले जाते. याबाबतच्या तक्रारीही आरटीओ तसेच रहदारी पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत.

लवकरच मीटर आधारित भाडे प्रणाली

शहरात 10 हजारहून अधिक प्रवासी ऑटो रिक्षा धावत आहेत. त्यापैकी 1600 रिक्षांचे मीटर आधीच कॅलिब्रेट करण्यात आले आहेत. उर्वरित रिक्षांचे कॅलिब्रेशन सुरू आहे. सर्व रिक्षांचे मीटर कॅलिब्रेट लवकरच करून मीटर आधारित भाडे प्रणाली लागू केली जाणार आहे.

- नागेश मुंडास, प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ)

Advertisement
Tags :

.