महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंचायत पोटनिवडणुकीसाठी 37 जणांचे अर्ज ग्राह्य

11:18 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अर्ज मागे घेतल्यानंतर आज चित्र होणार स्पष्ट : 23 जून रोजी निवडणूक, 24 रोजी निकाल

Advertisement

पणजी : दहा ग्रामपंचायती आणि एका जिल्हा पंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांमधून छाननीनंतर 37 अर्ज ग्राह्य ठरले आहेत. सुकूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग 10 साठी 6 अर्ज ग्राह्य ठरले असून त्यात हेरंब हळर्णकर, काजोल वाडकर, प्रसाद वाडकर, संजय रेडकर, सुभाष हळर्णकर, सुयषा हळर्णकर यांचा समावेश आहे. कुडणे पंचायतीच्या प्रभाग 2 साठी दाखल झालेले दोन्ही अर्ज ग्राह्य ठरले असून त्यात परेश पुनाजी आणि श्रीकांत चिकणेकर यांचा समावेश आहे. वळवई पंचायतीच्या प्रभाग 2 साठी दाखल झालेले दोन्ही अर्ज ग्राह्य ठरले असून त्यात अंकिता नाईक आणि सर्वेश नाईक यांचा समावेश आहे. केरी पंचायतीच्या प्रभाग 3 साठी चौघांचे अर्ज ग्राह्य ठरले आहेत. त्यात प्रदीप जल्मी, रामकृष्ण जल्मी, शकुंतला जल्मी आणि विशांत केरकर यांचा समावेश आहे. कुंडई पंचायतीच्या प्रभाग 7 साठी चौघांचे अर्ज ग्राह्य ठरले आहेत. त्यात प्रियांका गावडे, राजश्री गावडे, राजवी गावडे आणि संजना नाईक यांचा समावेश आहे. बोरी पंचायतीच्या प्रभाग 11 साठी तिघांचे अर्ज ग्राह्य ठरले आहेत. त्यात दत्तेश नाईक,नूतन नाईक आणि शिवानंद गावणेकर यांचा समावेश आहे.

Advertisement

राशोल पंचायतीच्या प्रभाग 5 साठी दोघांचे अर्ज ग्राह्य ठरले असून त्यात जासिंता फर्नांडिस आणि मीफा डायस यांचा समावेश आहे. सुरावली पंचायतीच्या प्रभाग 2 साठी दोघांचे अर्ज ग्राह्य ठरले असून त्यात ज्युलिएटा गोम्स आणि रेश्मा डिक्रूज यांचा समावेश आहे. असोळणे पंचायतीच्या प्रभाग 1 साठी तिघांचे अर्ज ग्राह्य ठरले असून त्यात एल्मा डिकॉस्टा, मारिया मोन्तेरो आणि वंदना बुधाळकर यांचा समावेश आहे. शेल्डे पंचायतीच्या प्रभाग 2 साठी चौघांचे अर्ज ग्राह्य ठरले आहेत. त्यात प्रकाश नाईक, संजय नाईक, स्वरांजली नाईक आणि तृप्ती गावस देसाई यांचा समावेश आहे. त्याशिवाय बाणावली जिल्हा पंचायतीसाठी पाच उमेदवारांचे अर्ज ग्राह्य ठरले आहेत. त्यात फ्रँक फर्नांडीस (अपक्ष), ग्राफान्स फर्नांडीस (अपक्ष), जोजफ पिमेंटा (आप), प्रदीप वेर्लेकर (अपक्ष) आणि रॉयला फर्नांडीस (अपक्ष) यांचा समावेश आहे. आज दि. 14 रोजी अर्ज मागे घेता येणार असून त्यानंतर अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. दि. 23 जून रोजी निवडणूक आणि दि. 24 रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article