For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

स्विगीच्या महसुलात 36 टक्के वाढ

07:00 AM Oct 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्विगीच्या महसुलात 36 टक्के वाढ
Advertisement

मुंबई : खाद्यपदार्थांचा पुरवठा करणारी स्विगी यांनी सप्टेंबर तिमाहीअखेरचा तिमाही निकाल जाहीर केला असून कंपनीच्या महसूलात 36 टक्के वाढ झाली असल्याची माहिती आहे. स्विगीचे नुकसान 15 टक्के कमी होऊन 922 कोटी रुपयांवर राहिले होते. कंपनीने जुलै ते सप्टेंबर तिमाहीत 7571 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. इन्स्टामार्टच्या विस्तारामुळे खर्च मात्र कंपनीचा वाढला आहे. समभाग यादरम्यान वर्षभरात 50 टक्के इतका घसरला आहे. मागच्या तिमाहीत कंपनीने 1092 कोटीचा तोटा सहन केला होता. महसूल पाहता मागच्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने 5561 कोटी रुपयांचा कमावला होता. जून तिमाहीत कंपनीने 6812 कोटी रुपये महसूल रुपात प्राप्त केले होते. कंपनीची क्वीक कॉमर्स इन्स्टामार्टच्या विस्तारामुळे कंपनीच्या उत्पन्नावर परिणाम होतो आहे. सप्टेंबर महिन्याच्या तिमाहीत कंपनीचा खर्चही वाढला होता. वर्षाच्या आधारावर 30 टक्के वाढीसह 8703 कोटीचा खर्च कंपनीला करावा लागला.

Advertisement

Advertisement
Tags :

.