For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अभिमानास्पद ! अखेर विश्वचषक भारताचाच

12:08 AM Jun 30, 2024 IST | अनुजा कुडतरकर
अभिमानास्पद   अखेर विश्वचषक भारताचाच
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

Advertisement

ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक अखेर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करीत तब्बल १३ वर्षांनी टी ट्वेण्टी विश्वचषकावर आपले नाव कोरून भारतीयांची मान उंचावली आहे.अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया कडून पराभूत झालेल्या रोहित शर्माच्या टीमने अखेर आज ट्वेंटी ट्वेंटी सामन्यात विश्वचषकामध्ये साऊथ आफ्रिकेचा पराभवाची धूळ चारली आहे . या विजयाचा शिल्पकार खऱ्या अर्थाने ठरला तो हार्दिक पांड्या. त्याने शेवटच्या षटकात 2 बळी घेतले आणि सूर्यकुमार यादवने घेतलेल्या मिनरलच्या झेलमुळे विश्वचषकावर भारताचे नाव अजरामर राहिले आहे. या विजयामुळे सर्वत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आनंदोत्सव करण्यात येत आहे. भारतीय संघाचा कोच राहुल द्रविड आणि त्याच्या सर्व टीमच्या खेळाडूंनी आज अक्षरशः अंतिम सामन्याच्या शेवटच्या शतकातील शेवटच्या चेंडूवर मिळालेल्या विजयानंतर आनंदाश्रू वाहत विजयोत्सव साजरा केला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.