वेंगुर्ले आगारातील उत्कृष्ट प्रवासी सेवा देणाऱ्या 35 कर्मचाऱ्यांचा गौरव
राज्य परिवहन मंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य
वेंगुर्ले (वार्ताहर)-
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ७७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून परिवहन महामंडळात सेवा बजावताना प्रवाशांचा प्रवास सुयोग्य व्हावा यासाठी प्रामाणिकपणे काम व उत्कृष्ट सेवा देणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या वेंगुर्ले आगारातील ३५ कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायत प्रवासी महासंघ (कोकण विभाग) अंतर्गत सन २०२५ राष्ट्रीय प्रवासी दिन पुरस्कार देऊन ग्राहक पंचायत प्रवासी संघाचे वेंगुर्ले तालुका अध्यक्ष राधाकृष्ण वेतुरकर यांच्या हृस्ते सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.यात वेंगुर्ले आगारातील कर्मचारी वाहतूक नियंत्रक सुनील धामोळे, वाहतूक नियंत्रक चंद्रशेखर सावंत, सहाय्यक भिकाजी निर्गुण, यांत्रिक कारागीर अभिजीत ठाकूर, शिवराम भोई, रोहन नांदोस्कर, अमित कुडतरकर, लिपिक विवेक नवार स्वप्नील खानोलकर, अर्चना कांबळी, चालक राजेश तांडेल, प्रदीप तांबे, उदय परब, योगेश बोवलेकर, गजानन जाधव, वाहक प्रदीप काकतकर, निहारिका होळकर, हरेश पाटकर, सुप्रिया दांडेकर, सेजल रजपूत, आरती वेंगुर्लेकर, सिमाली मठकर, समीर कांबळी, तृप्ती कांबळी, विजय पाटील, स्वामिनी सणगर, प्रांजल जाधव तर चालक तथा वाहक असलेले पंढरी ढोरे, राहुल आरोलकर, प्रकाश कराड, महेश सरमळकर, संभा सातजी, उल्हास चिंचकर, स्वच्छक पांडुरंग परब, सफाई कामगार प्रवीणा चव्हाण अशा ३५ जणांचा सन्मानपत्र देवून महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायत प्रवासी महासंघातर्फे, महासंघाचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष राधाकृष्ण वेतुरकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.