महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

एकाच वेळी 35 ‘गर्लफ्रेंडस्’...

06:21 AM Jun 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आचार्य अत्रे लिखित ‘तो मी नव्हेच’ हे प्रचंड गाजलेले नाटक असंख्यांना माहीत आहे. अगदी अलिकडच्या काळापर्यंत त्याचे प्रयोग होत होते. काझी नावाच्या एका लफंग्याने विविध तरुणींना फसवून त्यांच्याशी लग्ने कशी केली आणि नंतर त्यांची फसवणूक कशी केली, याची सत्यकथा या नाटकात आहे. याच  घटनेची पण थोड्या वेगळ्या प्रकारे पुनरावृत्ती जपान या देशात घडली आहे.

Advertisement

तकाशी मियागवा नामक एका जपानी लबाडाने विविध क्लृप्त्या करुन एकाचवेळी 35 तरुणींशी प्रथम मैत्रीचे आणि नंतर शारिरीक संबंध प्रस्थापित केले होते. ही घटना 2021 ची आहे. या तरुणी या माणसाच्या इतक्या आहारी गेल्या होत्या, की त्या त्याला महागड्या भेटवस्तू त्याच्या वाढदिवसाला भेट देत असत. अशा भेटवस्तू मिळत रहाव्यात यासाठी त्याने आपले 35 वेगवेगळे जन्म दिनांक सांगितले होते आणि या तरुणींनी त्याच्या बतावणीवर डोळे झाकून विश्वासही ठेवला होता. लक्षावधी रुपयांच्या भेटवस्तू त्याने अशा प्रकारे त्यांच्याकडून लाटल्या होत्या. शेवटी त्याची ही लबाडी बाहेर पडली. त्याने फसविलेल्या तरुणींनी न्याय मिळविण्यासाठी एक संघटना स्थापन केली आणि त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार सादर केली. मियागवा हा एका हैड्रोजन वॉटर साधनांच्या कंपनीत मार्केटिंग विभागात कामाला होता. आपल्या संवाद कौशल्याच्या हातोटीच्या बळावर त्याने हे कांड केले होते. तथापि, आता त्याच्यावर कायद्याचा बडगा उगारण्यात आला आहे.

Advertisement

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article