मे महिन्यात मोबाईल विक्रीत 35 टक्क्यांची घसरण
किंमती वाढल्याने मागणीवर दबाव: खरेदीदार झाले सावध
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
मेमरी चीपच्या वाढत्या किंमतीमुळे मोबाईलच्या किंमती मे महिन्यात जवळपास 35 टक्क्यांपर्यंत वाढल्या असल्याची माहिती काऊंटर पॉईंट यांच्या अहवालामध्ये देण्यात आलेली आहे.
का वाढल्या किमती
मेमरी चीपच्या खर्चामध्ये झालेल्या वाढीमुळे ही भरपाई भरुन काढण्यासाठी नोव्हेंबर 2025 पासून दर महिन्याला कंपन्या किंमती वाढवत आहेत. मोबाईलची विक्री वर्षाच्या आधारावर 30 ते 35 टक्के इतकी घसरली आहे. यामध्ये एकूण विक्रीमध्ये पाहता 60 टक्के इतकी मोबाईल विक्रीची हिस्सेदारी ऑफलाईन पद्धतीची आहे. इतर विक्री ही ऑनलाईन माध्यमातून झालेली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पातळीवर होणारी विक्री प्रभावीत झाली आहे.
शिपमेंटही घसरली
काऊंटर रिसर्च यांच्या अहवालानुसार मे महिन्यात मोबाईलची शिपमेंट वर्षाच्या आधारावर 15 ते 20 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. जूनमध्ये देखील अशीच घसरण राहू शकते, असे म्हटले जात आहे. वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीमध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान मोबाईल शिपमेंटमध्ये 3 टक्के घसरण झाली होती. मात्र दुसऱ्या तिमाहीत 15 टक्क्यांपेक्षा अधिक शिपमेंटमध्ये घसरण दिसली. मोबाईलच्या किंमतीमध्ये सातत्याने होणारी वाढ हे प्रमुख कारण मोबाईलची मागणी प्रभावीत करणारे ठरले आहे.
इतक्या वाढल्या किंमती
मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी ते मे या दरम्यानच्या काळात मोबाईल स्मार्टफोनच्या सरासरी किंमती 20 टक्क्यांपर्यंत वाढलेल्या आहेत. मागच्या वर्षी किंमती काही प्रमाणात वाढलेल्या होत्या. रिटेलरनुसार किंमती वाढल्यामुळे मागणीवर 40 ते 45 टक्क्यांचा परिणाम जाणवला आहे.