35 कोटी भाविकांचे महाकुंभमेळ्यात स्नान
06:35 AM Feb 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/प्रयागराज
Advertisement
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याचा रविवारी 21 वा दिवस होता. 13 जानेवारीपासून सुरू झालेल्या या पवित्र सोहळ्यात आतापर्यंत 35 कोटींहून अधिक भाविकांनी संगमात डुबकी मारली आहे. दिवसेंदिवस भाविकांचा ओघ वाढत असून रविवारी दुपारी 2 वाजेपर्यंत दिवसभरात 97 लाख भाविकांनी स्नान केल्याची नोंद झाली होती. गर्दी वाढत असल्याने घाटांच्या परिसरात हेलिकॉप्टरमधून सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच बोटींमधूनही संगमाचे निरीक्षण केले जात आहे. वसंत पंचमी स्नानाच्या पार्श्वभूमीवर 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान प्रयागराज शहर आणि घाट परिसरात वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. व्हीव्हीआयपी पास देखील रद्द करण्यात आले आहेत
Advertisement
Advertisement