For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News: घरात 35 मांजरे अन् दोन ट्रॉली कचरा, कर्माचारीही झाले अवाक!

11:22 AM Jun 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
kolhapur news  घरात 35 मांजरे अन् दोन ट्रॉली कचरा  कर्माचारीही झाले अवाक
Advertisement

सुरुवातील बुलबुले कुटुंबियांनी कारवाईस विरोध केला पण...

Advertisement

कोल्हापूर : रंकाळ स्टँड परिसरातील आयरेकर गल्लीमधील प्रदीप बुलबुले यांच्या घरामध्ये सुमारे 35 मांजरे आढळून आली तर तब्बल दोन ट्रॉली कचरा निघाला. घरामध्ये साचलेला दूर्गंधीयुक्त कचरा अन् अडगळ पाहून महापालिकेचे अधिकारी, कर्मचारीही अवाक झाले. येथील स्थानिक नागरिकांनी याबाबत केलेल्या तक्रारीनंतर बुधवारी महापालिकेने पोलीस बंदोबस्तात कारवाई केली.

सुरुवातील बुलबुले कुटुंबियांनी कारवाईस विरोध केला पण महापालिका कर्मचाऱ्यांनी त्यांना बाजूला करत कारवाई केली. यावेळी घरातील तीन मांजरे जप्त केली तर अन्य मांजरे पळून गेली. कारवाई दरम्यान मांजर चावल्याने एक कर्मचारी जखमी झाला. आयरेकर गल्लीमधील प्रदीप बुलबुले आणि त्यांच्या पत्नी माधुरी वास्तव्यास आहेत. या दाम्पत्याने घरामध्ये सुमारे 35 हून अधिक मांजरे असल्याचे स्थानिक नागरिकांमधून सांगण्यात आले.

Advertisement

घरामध्ये इतकी मांजरे असून बुलबुले दांम्पत्याकडून स्वच्छता ठेवली जात नव्हती. घरात मोठया प्रमाणात कचरा तसाच असल्याने दूर्गंधी पसरली होती. दूर्गंधीमुळे आरोग्याच प्रश्न निर्माण झाल्याने परिसरातील नागरिकांनी यासंदर्भात महापालिकेत तक्रार केली होती. त्याचबरोबर पोलीस ठाण्यातही या प्रकाराबाबत तक्रार दिली होती.

त्यानुसार पोलीस बंदोबस्तात बुधवारी महापालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी कारवाई करण्यासाठी आयरेकर गल्लीत दाखल झाले. सुरुवातील बुलबुले कुटुंबियांनी कारवाईस विरोध केला. मात्र पोलीस, मनपा कर्मचारी यांनी त्यांना बाजूला करत घरात प्रवेश केला. यावेळी घरातील स्थितीपाहुन सारेच आवाक झाले. घरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व दूर्गंधी होती.

कर्मचाऱ्यांनी सुरक्षेची घबरदारी घेत सफाईस सुरुवात केली. तर तब्बल दोन ट्रॉली भरुन घरामधून कचरा निघाला.मांजर चावल्याने कर्मचारी जखमी मनपाचे कर्मचारी कारवाईसाठी आल्याने बुलबुले दांम्पत्याने घरातील मेन स्विच बंद करत वीजपुरवठा खंडित केला.

तसेच कारवाईस विरोध केला. मात्र अंधारामध्येच कर्मचारी घरामध्ये आत गेले. यावेळी पाळीव मांजरे पळून गेली. यापैकी तीन मांजरे कर्मचाऱ्यांनी पकडली. यावेळी मांजर चावल्याने एक कर्मचारी जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तीन महिन्यांपासून तक्रार हा प्रकार गेल्या तीन महिन्यांपासून सुरु आहे. येथील नागरिकांनी तीन महिन्यांपूर्वीच महापालिकेत तक्रार केली होती. त्यानुसार मनपाने त्यांना नोटीस बजावली होती. यावेळी बुलबुले कुटुंबियांनी सफाईसाठी मुदत मागितली. पण त्यांच्यामध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. दुर्गंधी वाढल्याने परिसरातील नागरिकांनी अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर मनपा आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या कारवाई केली.

Advertisement
Tags :

.