कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोलंबियात 34 सैनिकांचे अपहरण, मुक्ततेसाठी प्रयत्न सुरू

06:48 AM Aug 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बोगोटा :

Advertisement

दक्षिण कोलंबियाच्या ग्वावियारे प्रांतात 34 सैनिकांचे ग्रामस्थांनी अपहरण केले आहे. हे ग्रामस्थ प्रत्यक्षात एका बंडखोर समुहाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. सैनिकांना एल रेटोर्नो गावात कैद करून ठेवण्यात आल्याची माहिती कोलंबिया सरकारकडून देण्यात आली. रेवोल्युशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबियाचे (एफआरसी) 10 बंडखोर मारले गेल्यावर सैनिकांचे अपहरण करण्यात आले आहे. ग्रामस्थ आता सैनिकांच्या मुक्ततेच्या बदल्यात मारले गेलेल्या बंडखोरांच्या मृतदेहांची मागणी करत आहेत. हे मृतदेह प्रांतीय राजधानीच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. ग्रामस्थांचे हे कृत्य पूर्णपणे अवैध असून सैन्यमोहिमेला रोखणारे असल्याचे संरक्षणमंत्री पेड्रो सांचेज यांनी म्हटले आहे.

Advertisement

कोलंबिया दशकांपासून गृहयुद्ध आणि बंडखोरांच्या हिंसेमुळे त्रस्त राहिला आहे. 2016 साली  कोलंबिया सरकार आणि एफआरसी बंडखोरांदरम्यान शांतता करार झाला होता. परंतु काही असंतुष्ट बंडखोर गट अद्याप सक्रीय असून ग्रामीण भागांमध्ये अस्थिरता निर्माण करत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article