34 खाण कामगार बलुचिस्तानमध्ये ठार
06:16 AM Aug 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
कोळसा खाणीत मिथेन वायूचा स्फोट
Advertisement
► वृत्तसंस्था
बलुचिस्तान
Advertisement
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील एका कोळसा खाणीत मिथेन वायूचा स्फोट होऊन 34 खाण कामगार ठार झाले. हा अपघात गुरुवारी क्वेटाच्या बाहेरील भागात एका खाणीत घडला. रात्रभर चाललेल्या बचावकार्यानंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्राथमिक माहितीनुसार खाणीत 42 लोक कार्यरत होते. बचाव पथकांनी सर्वांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. या दुर्घटनेवर बलुचिस्तानचे खाण आणि खनिज मंत्री शोएब नोशेरवानी यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली. बलुचिस्तानमध्ये कोळसा खाणीतील अपघात सामान्य आहेत. अनेक खाणींमध्ये पुरेशी वायुवीजन व्यवस्था, मिथेन वायू निरीक्षण प्रणाली आणि इतर मूलभूत सुरक्षा उपायांचा अभाव आहे.
Advertisement