थडग्यात मिळाले ३३०० वर्षे जुने सँडल
इजिप्तच्या इतिहासात तूतनखामुनचे नाव सर्वात चर्चित आहे. वयाच्या केवळ 17 व्या वर्षी मृत्यू झालेल्या या युवा फारोचे थडगे 1922 मध्ये ब्रिटिश पुरातत्वतज्ञ हॉवर्ड कार्टर यांनी शोधले होते. या थडग्यामधून 5 हजारांहून अधिक मूल्यवान वस्तू मिळाल्या होत्या, ज्यात सोन्याचा डेथ मास्क, प्राण्यांच्या मूर्ती, हाडं आणि अनेक पादत्राणं सामील होती. यातील पादत्राणांच्या एका जोडीने सर्वांना चकित केले आहे. याच्या तळव्यांवर शत्रूंची चित्रे असून जी फारोंच्या पायांखाली चिरडली जात आहेत. हे सँडल लाकडाने निर्मित असून ज्यावर चामडे, साल, गोल्ड फॉइलचे आवरण चढविण्यात आले आहे. पांढऱ्या रंगावर हे चित्र निर्माण करण्यात आले होते. सर्वात धक्कादायक हिस्स याच्या तळव्याचा भाग असून यात राजा कैद्यांवर चालताना दिसून येतो.
सँडलमध्ये आशियाई आणि आफ्रिकन कैद्यांची चित्रे दिसून आली, जे बांधलेल्या अवस्थेत होते. एका सँडलवर आशियाई कैदी तर दुसऱ्यावर आफ्रिकन कैदी दोघांचेही हात मागे बांधलेले दाखविण्यात आले आहेत. याच्या दरम्यान लोटस (उत्तर इजिप्तचे प्रतीक) आणि पेपिरस (दक्षिण इजिप्तचे प्रतीक)ने बांधलेले दाखविण्यात आले आहेत. प्रत्येक सँडलवर आठ ‘बो’ शस्त्रs रेखाटण्यात आली आहेत. पायांच्या बोटानजीक देखील बोचा आकार आहे, प्राचीन इजिप्तमध्ये ‘नाइन बो’ज शत्रूंचे सामूहिक प्रतीक होते. प्रत्येक पावलावर फारो या शत्रूंना चिरडत होता, जे त्याची सर्वोच्चता आणि इजिप्तचे शक्तीचे प्रतीक होते.
असा होता संदेश
हे केवळ फॅशन नव्हे, तर राजकीय आणि धार्मिक संदेश होता, फारो जेथे जाईल, शत्रू त्याच्या टाचेखाली असतील, असा हा संदेश होता. हे सँडल कैरोच्या इजिप्तिशियन म्युझियमध्ये प्रदर्शित आहेत. बांधलेले कैदी फारोच्या शक्तीचे प्रतीक असल्याचे म्युझियमच्या माहितीफलकावर नमूद आहे. तूतनखामुन 18 व्या राजघराण्याचा 11 वा फारो होता. त्याचे जन्म नाव तूतनखामेन होते. वयाच्या 8-9 व्या वर्षी त्याला सिंहासन मिळाले होते, त्याचे पिता अखेनातेन क्रांतिकारी फारो हेते, ज्यांनी एकेश्वरवाद इजिप्तमध्ये आणला होता.