For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

33 टक्के महिला आरक्षण 2032 मध्ये लागू शक्य

06:10 AM Mar 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
33 टक्के महिला आरक्षण 2032 मध्ये लागू शक्य
Advertisement

केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी : बेंगळुरात निजदकडून महिला दिन कार्यक्रम

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

लोकसभा आणि विधानसभेत महिलांना देण्यात आलेले 33 टक्के आरक्षण येत्या काळात संसदीय व्यवस्थेचा अभिमान आणखी वाढवेल. मला असलेल्या माहितीनुसार, 2032-33 मध्ये महिला आरक्षण लागू होण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले. बेंगळुरातील डॉ. बाबू जगजीवन राम भवन येथे निजद महिला घटकाने आयोजित केलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Advertisement

कुमारस्वामी पुढे म्हणाले, जर 33 टक्के महिला आरक्षण लागू केले तर विधानसभेत 75 महिला आमदार असतील. सर्व पक्षांच्या महिलांनी मनावर घेतल्यास राज्यात एक महिला मुख्यमंत्री होऊ शकते. आरक्षणाच्या माध्यमातून अशी संधी शक्मय होईल. आज नरेंद्र मोदींच्या संकल्पामुळे देशात महिला आरक्षण लागू होत आहे. याचे स्वप्न देवेगौडांनी पाहिले होते. देवेगौडा यांनी महिलांसाठी खूप काही केले आहे. राज्यात पहिल्यांदाच देवेगौडा यांनी 70 टक्के महिला शिक्षकांची नियुक्ती केली होती, असे त्यांनी सांगितले.

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना 50 टक्के आरक्षण दिले. 1996 मध्ये देवेगौडा पंतप्रधान झाल्यावर त्यांनी राज्यसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासाठी एक विधेयक मांडले होते. तथापि, समाजवादी पक्ष आणि राजदने त्याला पाठिंबा न दिल्याने लोकसभेत हे विधेयक संमत झाले नाही. परंतु, देवाची कृपा होती. आज आपण एनडीए युतीमध्ये आहोत. मोदींनी देवेगौडा यांचे स्वप्न लोकसभेत साकार केले आहेत, असेही केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले.

Advertisement

.