उद्या बावळाटच्या देवी सातेरी माऊली पंचायतनचा ३२ वा वाढदिवस
05:20 PM Mar 07, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
विविध कार्यक्रमांचे आयोजन
Advertisement
ओटवणे प्रतिनिधी
बावळाट गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी माऊली पंचायतनचा ३२ वा वर्धापन दिन सोहळा शनिवारी ८ मार्च रोजी विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सातेरी माऊलीचे हजारो भाविक दर्शन घेतात यानिमित्त मंदिरात सकाळी ९:३० वाजता अभिषेक, पुजा, सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, त्यानंतर या देवस्थानच्या कवी कृष्णा देवळे लिखित भक्तीगीत व स्तोत्र याचे प्रकाशन करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता आरती त्यानंतर महाप्रसाद सायंकाळी ४ वाजता महिलांच्या फुघड्या, सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांची भजने, रात्री ११:३० वाजता जय हनुमान पारंपारीक दशावतार नाट्यमंडळाचा (दांडेली आरोस) नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे मानकरी तसेच बावळाट ग्रामस्थांनी केले आहे.
Advertisement
Advertisement