For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेदांताने उभारले 3200 कोटी

06:43 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
वेदांताने उभारले 3200 कोटी
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

वेदांता कंपनीने हिंदुस्थान झिंक लिमिटेडचे समभाग विकत 3200 कोटी रुपयांची उभारणी केली आहे. गुंतवणूकदारांचा ऑफर फॉर सेलला चांगला प्रतिसाद लाभला आहे. सदरच्या उभारलेल्या रक्कमेचा वापर कंपनी विस्तार योजनेसाठी व इतर कामांसाठी वापरणार आहे.

खाण क्षेत्रातील दिग्गज कंपनी वेदांता लिमिटेड यांनी आपली सहकारी कंपनी हिंदुस्थान झिंक लिमिटेडच्या समभागांची विक्री केली आहे. यातून 3200 कोटी रुपये उभारले गेले आहेत. समभाग सादरीकरणात किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. मागच्या महिन्यातच कंपनीने संस्थात्मक पातळीवर 8500 कोटी रुपयांची उभारणी केली होती. वेदांता समूह आणि एचझेडएल यांचे कर्ज कमी करण्यासाठी या रक्कमेचा वापर होणार आहे. 16 ऑगस्ट ते 19 ऑगस्टदरम्यान ऑफर फॉर सेलची प्रक्रिया कंपनीने राबवली होती. यानंतर हिंदुस्थान झिंकमध्ये वेदांताचा समभाग हिस्सेदारी 63 टक्के इतकी राहिली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.