For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

3200 कोटीची फसवणूक, चौधरी विरोधात रेड कॉर्नर नोटीस

06:24 AM Feb 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
3200 कोटीची फसवणूक  चौधरी विरोधात रेड कॉर्नर नोटीस
Advertisement

वृत्तसंस्था/ भोपाळ

Advertisement

मध्यप्रदेशच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) एका मोठ्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणाचा मुख्य आरोपी लविश चौधरी (उर्फ नवाब) विरोधात आता इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस जारी करविली आहे. या प्रकरणात अनेक राज्यांच्या गुंतवणुकदारांची 3200 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक करण्यात आली आहे.

यापूर्वी एसटीएफने इंटरपोलच्या मदतीने ब्ल्यू कॉर्नर नोटीसद्वारे दुबईतील लविशच्या ठावठिकाण्याचे ठोस पुरावे जमविले होते. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे नेटवर्क मोडून काढण्यासाठी प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एसटीएफने इंदोरच्या विशेष न्यायालयात यासंबंधी अर्ज दाखल केला आहे.  न्यायालयाची मंजुरी मिळताच सर्व आवश्यक दस्तऐवज राज्य सरकारकडे पाठविण्यात येतील, मग ते केंद्रीय गृहमंत्रालय आणि विदेश मंत्रालयाच्या माध्यमातून संयुक्त अरब अमिरातला सोपविण्यात येणार आहेत. कायदेशीर समस्या न उद्भवल्यास आगामी 3-4 महिन्यांमध्ये लविश चौधरीच्या प्रत्यार्पणाला युएईचे न्यायालय मंजुरी देऊ शकते.

Advertisement

Advertisement
Tags :

.