For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेक्सिकोत हिंसा 32 ठार

06:21 AM Feb 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
मेक्सिकोत हिंसा  32 ठार
Advertisement

एल मेंचोचा खात्मा : प्रेयसीमुळे लागला कुख्यात माफियाचा सुगावा

Advertisement

वृत्तसंस्था/ मेक्सिको सिटी

मेक्सिकोत सैन्याने एक मोहीम राबवून देशातील सर्वात मोठा ड्रग माफिया एल मेंचोचा खात्मा केला होता. मेक्सिकोचे संरक्षणमंत्री रिकार्डो ट्रेविला यांच्यानुसार मेंचोचा ठावठिकाणा त्याच्या प्रेयसीमुळे लागला आहे. सैन्य दीर्घकाळापासून त्याच्या प्रेयसीवर नजर ठेवून होते. एच मेंचोच्या खात्म्यानंतर मेक्सिकोत हिंसा सुरू झाली असून त्याच्या समर्थकांनी 20 राज्यांमध्ये जाळपोळ अन् लूटपाट केली आहे. अनेक ठिकाणी वाहतूक रोखत वाहने आणि 20 हून अधिक सरकारी बँक शाखांना आग लावण्यात आली.

Advertisement

जालिस्को शहरात लॉकडाउनची स्थिती असून हे शहर फीफा 2026 च्या आयोजक शहरांमध्ये सामील आहे. विविध शहरांमध्ये कमीतकमी 32 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 25 सैनिक सामील आहेत. तर सैन्याने कारवाईदरम्यान चिलखती वाहने आणि रॉकेट लाँचरसमवेत मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रs जप्त केली आहेत. सैन्याच्या मोहिमेदरम्यान एल मेंचो जखमी झाला होता, त्याला एअरलिफ्ट करत मेक्सिको सिटी येथे आणले जात असताना त्याचा मृत्यू झाला होता. या ऑपरेशनमध्ये मेंचोसोबत अन्य 8 गुन्हेगारही मारले गेले होते.

प्रेयसीवर ठेवली होती पाळत

गुप्तचर यंत्रणांनी एल मेंचोच्या प्रेयसीशी संबंधित एका विश्वासू सहकाऱ्याची ओळख पटविली होती. त्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली होती. याच इसमाने एल मेंचोच्या प्रेयसीला जालिस्कोनजीक एका परिसरात पोहोचविले होते. ज्याचा पाठलाग करत सैन्य तेथे पोहोचले होते. महिला तेथून निघाल्यावर मोठ्या सुरक्षेत एल मेंचो परिसरात असल्याची खात्री अधिकाऱ्यांना झाली. यानंतर सुरक्षा दलांनी त्वरित ऑपरेशन सुरू केले आणि एक दिवसाने पूर्ण परिसराला घेरले. यादरम्यान मेंचोच्या गुंडांनी सैन्याच्या दिशेने गोळीबार सुरू केला होता. सैन्याच्या प्रत्युत्तरात मेंचो जखमी झाला, त्याचे सहकारी त्याला घेऊन नजीकच्या जंगलात पळाले. सैनिकांनी मोठ्या प्रयत्नानंतर त्याला शोधून काढले होते.

136 कोटी रुपयांचे होते इनाम

एल मेंचो हा जालिस्को न्यू जनरेशन कार्टेलचा प्रमुख होता. जालिस्को कार्टेल मेक्सिकोत ड्रग तयार करणे आणि विक्री, स्थानिक व्यावसायिकांकडून खंडणी वसूल करण आणि अनेक भागांमध्ये लोकांना धमकाविण्यासाठी कुख्यात राहिले आहे. या कार्टेलचे अस्तित्व अमेरिकेच्या 50 प्रांतांमध्ये आहे. अमेरिकेने एल मेंचो विरोधात 136 कोटी रुपयांचे इनाम जाहीर केले होते.

Advertisement
Tags :

.