32 कोटीचे घर 1 हजारात
अलिकडच्या काळात घरे किंवा स्थावर मालमत्तांच्या किमती इतक्या प्रचंड प्रमाणात वाढत आहेत, की त्यांची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. अशावेळी आपल्याला असे कोणी सांगितले, की 32 कोटी रुपये किमतीचे घर 1 हजार रुपयांमध्ये मिळेल, तर आपला विश्वास बसणे कठीण नव्हे, अशक्य आहे. तथापि, स्पेन देशाच्या बेलिएकरिक बेटावर एक अलिशान बंगला असा आहे की ज्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये 32 कोटी रुपये इतकी होत आहे आणि ते बंगला अवघ्या 1 हजार रुपयांना विकत देण्याची त्याच्या धन्याची इच्छा आहे. ही संधी केवळ 28 जानेवारी 2023 पर्यंतच आहे, याची नोंद घेणे आवश्यक आहे. मात्र, ही संधी साधण्यासाठी आपल्याला एका अटीची पूर्तता करावी लागणार आहे. ही संधी केवळ ब्रिटनच्या नागरीकांसाठीच उपलब्ध आहे. याचाच अर्थ असा की, ब्रिटनचे नागरिकत्व ज्यांच्याकडे आहे, त्यांनाच ही संधी साधता येईल, असे अनेक नागरीक असू शकतील. त्यांच्यात ड्रॉ काढला जाईल. जो ब्रिटीश नागरीक भाग्यवान असेल, त्याच्या नावे हा बंगला केला जाईल, असे या बंगल्याच्या धन्याने स्पष्ट केले आहे. याला चॅरिटी सुपरड्रॉ असे संबोधण्यात आले आहे. या बंगल्याच्या नोंदणीचे शुल्क स्मृतीभ्रंश किंवा अल्झायमय या विकाराच्या संशोधकासाठी दिले जाणार आहे, ब्रिटनमध्ये या विकाराचे थैमान होत आहे. ब्रिटनच्या इंग्लंड आणि वेल्स या भागांमध्ये 2022 या एकाच वर्षात या विकाराने 74 हजार लोकांचा बळी गेले आहेत. ब्रिटनचे संशोधक या विकारावर उपाय शोधून काढण्यासाठी युद्ध पातळीवर संशोधन करीत असून त्यांच्या संशोधनाला आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी नोंदणी शुल्क संशोधनासाठी दान केले जात आहे.