विद्युत संघाच्या निवडणुकीत 32 उमेदवार रिंगणात
निवडणूक अधिकारी सुभाष संपगावी यांची माहिती
वार्ताहर/ हुक्केरी
हुक्केरी तालुका ग्रामीण विद्युत सहकारी संघाची निवडणूक दि. 28 रोजी होणार आहे. या निवडणुकीत 15 जागेसाठी एकूण 116 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये 32 उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी सुभाष संपगावी यांनी दिली. सामान्य 9 जागेसाठी 20 उमेदवार, महिला 2 जागेसाठी 4 उमेदवार, मागास अ वर्गासाठी 2 उमेदवार, मागास ब वर्गासाठी 2 उमेदवार, मागास जातीच्या 1 जागेसाठी 2 उमेदवार, मागास वर्गाच्या 1 जागेसाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत.
सामान्य 9 जागेसाठी अमर नलवडे, अशोक पट्टणशट्टी, लव कत्ती, किरण कल्लट्टी, गजानन मगदूम, कलगौडा पाटील, प्रभुदेव पाटील, विनय पाटील, बसप्पा मरडी, बसगौडा मगेन्नावर, शिवकुमार मटगार, शिवनगौडा मदवाल, महावीर निलजगी, शिवानंद मुडशी, लक्ष्मण मुन्नोळी, सरदार वर्धमाने, शंकरेप्पा शिरकोळी, महादेव क्षिरसागर, शशीराज पाटील, केंपण्णा वासेदार, महिला 2 जागेसाठी महबूबी नाईकवाडी, भाग्यश्री पाटील, मंगल मुडलगी, सुमित्रा शिडलीहाळ, मागास अ वर्गाच्या 1 जागेसाठी गजानन क्वळ्ळी, शंकर हेगडे, मागास ब वर्गाच्या 1 जागेसाठी दयानंद पाटील, सत्याप्पा नाईक, मागास जातीच्या 1 जागेसाठी श्रीमंता सत्यनाईक, लक्ष्मण हुली, मागास वर्गाच्या 1 जागेसाठी बसवराज नाईक, बसवाणी लकेप्पगोळ या उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आल्याची माहिती दिली आहे.