For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अफगाणमध्ये पंधरवड्यात पाऊस-पुराचे 315 बळी

06:31 AM May 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
अफगाणमध्ये पंधरवड्यात पाऊस पुराचे 315 बळी
Advertisement

वृत्तसंस्था/ काबूल

Advertisement

अफगाणिस्तानमध्ये दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 315 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा अजून वाढू शकतो, असे तालिबानी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या पावसामुळे बदख्शान, घोर, बागलान आणि हेरातमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे.

मुसळधार पावसामुळे 1,600 लोक जखमी झाले असून दोन हजारहून अधिक घरांची पडझड झाली आहे. अचानक आलेल्या पुरामुळे अफगाणिस्तानला जबर फटका बसला आहे. बागलानमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. बागलानकडे जाणारा रस्ताही वाहून गेल्यामुळे तेथे मदत पोहोचण्यास विलंब होत आहे. तेथून लोकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराची मदत घेतली जात आहे. तसेच बागलानमधील लोकांना बाहेर काढण्यासाठी हवाई दल तैनात करण्यात आल्याचे तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. तसेच अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने आंतरराष्ट्रीय संघटनांना विलंब न करता मदत करण्यास सांगितले आहे. संघटनांनी मदत न केल्यास हजारो लोक दगावतील असा दावाही करण्यात आला आहे.

Advertisement

अफगाणिस्तानच्या बहुतांश राज्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध आपत्कालीन दल मदतकार्यात गुंतल्याचे आयआरसीच्या संचालक सलमा बेन आयसा यांनी सांगितले. जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे अफगाणिस्तानातील अनेक राज्यांमध्ये दोन आठवड्यांपासून वीजपुरवठाही खंडित झाला आहे.

Advertisement
Tags :

.