For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्नॅपचॅटवरील ओळख, फिरायला नेऊन केला अत्याचार ; ३१ वर्षीय तरुणाला बेड्या

05:48 PM Jan 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
स्नॅपचॅटवरील ओळख  फिरायला नेऊन केला अत्याचार   ३१ वर्षीय तरुणाला बेड्या
Advertisement

प्रतिनिधी : ओरोस

Advertisement

बारावीत शिकणाऱ्या एका युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विठ्ठल भगवान शिंदे (३१, रा. हिवाळे, ता. मालवण) या संशयितावर सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मालवण तालुक्यातील एका गावातील एक मुलगी नजिकच्या गावातील कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेत होती. दररोज ती बसने प्रवास करत होती.बारावीत शिकणाऱ्या आणि वयाची १८ वर्षे नुकतीच पूर्ण केलेल्या या मुलीची मोबाईल स्नॅपचॅटच्या माध्यमातून विठ्ठल याच्याशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले होते. संवाद वाढल्यानंतर त्याने फिरायला जाण्याच्या निमित्ताने तिला मोटार सायकल वरून वेगवेगळ्या ठिकाणी नेत तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. १७ डिसेंबर २०२५ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत ही घटना घडली होती. अशा आशयाची फिर्याद संबंधित पीडित मुलीने सिंधुदुर्गनगरी पोलिसात दिली आहे. त्यानुसार विठ्ठल शिंदे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ६४(२)(म) नुसार 25 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली. सायंकाळी सिंधुदुर्गनगरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सहदिवाणी न्यायाधीश व. स्तर व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी अे. जी. देशिंगकर यांनी त्याला 28 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सूरज पाटील करत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.