पेरूमध्ये 3 हजार वर्षे जुन्या सांगाड्यांचा शोध
पेरू या देशाच्या उत्तर किनाऱ्यावर 3 हजार वर्षे जुने मानवी सांगाडे हस्तगत झाले आहेत. पुरातत्व तज्ञांना येथे 14 मानवी सांगाडे मिळाले आहेत. ज्यातील बहुतांश सांगाड्याचे शीर जमिनीत रुतलेले आणि हात बांधलेले आढळून आले आहेत. हे सांगाडे पेरूच्या उत्तर किनाऱ्यावर एका अनुष्ठानिक मंदिरानजीक मिळाले आहेत. हे मंदिर क्यूपिसनिक संस्कृतीचा हिस्सा असून ही संस्कृती शतकांपूर्वी पेरूमध्ये बहरली होती.

सर्व सांगाडे वाळूच्या टेकड्यांवर मिळाले आहेत. या टेकड्यांवर ख•s खणत हे सांगाडे ठेवण्यात आले होते. तर सर्वसाधारणपणे सांगाडे दफन करण्यासोबत ढीगभर खजिना किंवा अन्य गोष्टीही दफन केल्या जातात, परंतु या सांगाड्यांकडे अशा कुठलीच सामग्री मिळालेली नाही. सांगाड्यांचे उत्खनन करणाऱ्या पथकाचे नेतृत्व करणारे पुरातत्व तज्ञ हेन्री टँटालियन यांनी यासंबंधी माहिती दिली आहे, ज्याप्रकारे सर्व सांगाड्यांना दफन करण्यात आले आहे ते अत्यंत असाधारण आहे. हे बहुधा मानवी बळीचा हिस्सा राहिले असण्याची शक्यता आहे. हे सर्व सांगाडे पेरूची राजधानी लीमापासून 420 मैल अंतरावरील ला लिबर्टाडमध्ये समुद्रानजीक मिळाले आहेत. सांगाडे मिळाल्यावर या क्षेत्राला महत्त्वपूर्ण पुरातात्विक स्थळांच्या यादीत सामील करण्यात आले आहे.