उत्खननात सापडले 3 हजार वर्षे जुने शहर
दक्षिण मेक्सिकोच्या पीएचडी विद्यार्थ्याला गुगल सर्च करताना काही ऐतिहासिक गवसले आहे. त्याला चीनच्या मेरिटाइम सिल्क रोडच्या सुरुवातीला काही प्राचीन शहरासारखे दिसून आले. जेव्हा या ठिकाणी उत्खनन करण्यात आले असता समोर आलेल्या चित्राने सर्वांना चकित केले आहे.
चीनच्या दक्षिण पूर्व हिस्स्यात असलेल्या सिटी ऑफ गुइलिनमध्ये गोंगशेंग याओ काउंटी आहे. जेथे द नियुलुचॉन्ग साइट आहे. हे पहिल्यांदा 2022 मध्ये एका बिल्डरने शोधले होते, जेव्हा तेथे खोदकाम करण्यात आले तेव्हा काही पॅटर्न्ड विटा आणि तुटलेली भांडी मिळील होती. परंतु यावेळी तेथे जे मिळाले ते पूर्ण शहराचा सेटअप आहे.
उत्खननात डबल सिटी भिंती आणि त्याच्या आसपास दरी आढळून आल्याचे या प्रोजेक्टच्या लीडर हे एन्यी यांनी सांगितले आहे. नियुलुचॉन्गमध्ये अशाप्रकारचा प्राचीन सेटअप सुमारे 165 मीटर लांब आणि 140 मीटर रुंद आहे. हा पूर्ण भाग 32,100 चौरस मीटरमध्ये फैलावलेला आहे. शहराच्या उत्तर अणि पश्चिमेकडील भिंती चांगल्या अवस्थेत आहेत. पुरातत्व तज्ञांनी येथून आकर्षक सांस्कृतिक अवशेष शोधून काढले आहेत. ज्यात भांडी अन् दगडी उपकरणे सामील आहेत. राखेचा खड्डा अन् स्तंभांचे खड्ड देखील आहेत. याला लिंगनान भागाशी जोडून पाहिले जात आहे, जे सध्याच्या गुआंग्शी, गुआंगडॉन्ग आणि हैनान प्रांत आहे.
लिगनान महत्त्वपूर्ण आहे कारण हे मेरिटाइम सिल्क रोडचा प्रारंभिक बिंदू आहे. या नव्या शोधावर टीम स्वत:चे संशोधन सुरूच ठेवणार आहे. येथे जुने धान्य मिळाले असून काही पितळीची किंवा तांब्याची अस्त्रही प्राप्त झाली आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने आता जुने शहर समोर येत असल्याचे हे एन्यी यांनी सांगितले आहे.