For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाक-अफगाण संघर्षात 300 ठार, 500 जखमी

06:56 AM Mar 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाक अफगाण संघर्षात 300 ठार  500 जखमी
Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

Advertisement

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील लष्करी संघर्षात दोन्ही बाजूंचे 300 हून अधिक लोक मारले गेले आहेत. तसेच 500 हून अधिक जखमी झाले आहेत. दोन्ही देश एकमेकांना पुढील लष्करी कारवाईची धमकी देत आहेत. पाकिस्तानी लष्कराचे प्रवत्ते अहमद शरीफ चौधरी यांनी रविवारी जीवितहानीबाबत माहिती देताना आतापर्यंत 274 तालिबानी लढाऊ मारले गेल्याचे म्हटले आहे. तसेच 400 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याव्यतिरिक्त 115 रणगाडे आणि चिलखती वाहने नष्ट झाली आहेत, 74 चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत आणि पाकिस्तानी सैन्याने 18 चौक्यांचा ताबा घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्ताननेही आपले 12 सैनिक मारले गेले आहेत आणि 27 जखमी झाल्याचे म्हटले आहे. याचदरम्यान, पाकिस्तानच्या लष्करी प्रवक्त्यांनी देशातील दहशतवादी हल्ल्यांमागे भारताचा हात असल्याचा आरोप केला.

Advertisement
Advertisement
Tags :

.