दिल्ली -हरियाणातील 30 मल्ल तात्पुरते निलंबित
बनावट जन्मपत्र दाखल केल्याचा ठपका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ज्युनियर स्तरावर स्पर्धा करणाऱ्या वयस्कर मल्लांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय कुस्ती महासंघाने मागिल महिन्यात 400 हून अधिक प्रकरणांची चौकशी केल्यानंतर त्यापैकी 30 जणांना तात्पुरते निलंबित केले आहे.
दिल्ली ‘आखाड्यां’मधील प्रशिक्षक आणि कुस्तीगीरांच्या तक्रारींवरून कारवाई केली होती. यामधील हरियाणातील अनेक कुस्तीगीरांनी राष्ट्रीय राजधानीत जन्मलेले आणि ज्युनियर स्तरावर स्पर्धा करण्यास पात्र असल्याचे दाखवण्यासाठी बनावट प्रमाणपत्रे मिळवली होती. बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया गेम्समध्ये दोन जादा वय असलेल्या कुस्तीगीरांनी पदके जिंकली. पण यावेळी खेळाडूचे करिअर खराब करायचे नाही म्हणून आम्ही त्यांना अंडर 18 आणि कॅडेट्ससारख्या ज्युनियर स्तरावरील स्पर्धांपासून बंदी घातली आहे. त्या खेळाडूंनी वरिष्ठ स्तरावर स्पर्धा करावी, जर ते 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे असतील तर त्यांनी त्यांच्या मूळ राज्याचे प्रतिनिधित्व केले पाहिजे, असे अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. या खेळाडूनी केलेल्या फसवणुकीबद्दल माफी मागावी लागेल. मागिल 30-40 दिवसांत आम्ही सुमारे 30 गुन्हेगारांना निलंबित केले आहे. या वेळी अधिकाऱ्याने स्पष्ट केले की यापैकी बहुतेक कुस्तीगीरांनी, हरियाणामधील त्यांच्या प्रशिक्षकांनी दिशाभूल करून, दिल्लीतील नरेला आणि रोहिणी झोनमधून बनावट जन्म प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी लाच दिली आहे.
यामध्ये 436 प्रकरणांपैकी सुमारे 300 प्रकरणे नरेला झोनमधील होती, तर उर्वरित सुलतानपुरी आणि मंगोलपुरीसारख्या रोहिणी झोनमधील होती. यामधील काहीना बेगमपुरा येथून प्रमाणपत्रे मिळत होती. हरियाणा संघात निवड होणे सोपे नसल्यामुळे ते सर्व दिल्लीचे प्रतिनिधित्व करत होते. तक्रारी समोर आल्यानंतर एमसीडी आणि दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्डाशी संपर्क साधला आणि चौकशी आणि पडताळणीनंतर ते बनावट प्रमाणपत्र असल्याचे सिद्ध झाले, असे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणामध्ये प्रशिक्षकांना दोषी ठरवले पाहिजे. त्यांच्या मुलांना स्पर्धांमध्ये पदके जिंकून प्रसिद्धी मिळवून द्यायची असते. या लोभामुळे त्यांना ज्युनियर स्तरावर जास्त वयाचे कुस्तीगीरना खेळवायला लागते, असे ते पुढे म्हणाले.
त्यानंतर डब्ल्यूएफआयने खेलो इंडियाच्या गेम्स टेक्निकल कमिटीकडे बनावट जन्म प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल एका महिला कुस्तीगीरला स्पर्धेतून बाहेर काढण्याची तक्रार केली होती. या महिला कुस्तीगीरने दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्डाने जारी केलेले प्रमाणपत्र सादर केले होते. या बोर्डाशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी आम्हाला पुष्टी दिली की त्यांनी असे कोणतेही प्रमाणपत्र जारी केलेले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. येथील संबंधित सायबर कॅफे मालकांना प्रमाणपत्रावर बनावट बार कोड तयार करण्यासाठी मोठी रक्कम देतात.