मिडकॅप, स्मॉलकॅप फंडात 6 महिन्यात 30 हजार कोटींची गुंतवणूक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एप्रिल ते सप्टेंबरच्या कालावधीमध्ये मिडकॅप आणि स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांमध्ये 30 हजार 350 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. चालू आर्थिक वर्षातील ही कामगिरी म्युच्युअल फंडातील दिसून आली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया यांनी ही माहिती दिली आहे.
यंदा 30 हजार 350 कोटींची गुंतवणूक वरील दोन फंडांमध्ये गुंतवणूकदारांनी एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यात केली आहे. मागच्या वर्षी याच अवधीतील हीच गुंतवणूक 32 हजार 924 कोटी रुपये इतकी दिसून आली होती. म्हणजेच यंदा गुंतवणूक काहीशी घटली आहे. स्मॉल कॅप आणि मिडकॅप फंडांमध्ये गुंतवणुकीसंदर्भात सेबीने अलीकडेच कडक नियम केल्याने गुंतवणूकदार काहीसे सावध राहिल्याचे दिसून आले.
किती गुंतवणूक झाली
मिडकॅप फंडांमध्ये 14,756 कोटी रुपये आणि स्मॉल कॅप फंडांमध्ये 15586 कोटी रुपये आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये गुंतवले गेले असल्याचेही समोर आले आहे.