For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हाधिकारी आवारातील 30 इमारती होणार जमीनदोस्त

06:58 AM Dec 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
जिल्हाधिकारी आवारातील  30 इमारती होणार जमीनदोस्त
Advertisement

सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सर्वेक्षण पूर्ण

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

नियोजित जिल्हाधिकारी नूतन इमारतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दोन एकर जागा संपादित करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरात असणाऱ्या विविध सरकारी खात्यांच्या 30 इमारती जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या इमारतींचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले आहे.

Advertisement

नियोजित जिल्हाधिकारी नूतन इमारत सहा मजली उभारण्यात येणार आहे. या परिसराचा विकास करून रस्त्यांचे रुंदीकरणही करण्यात येणार आहे. सध्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या विविध सरकारी कार्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या ठिकाणी सध्या ब्रिटिशकालीन उपनोंदणी कार्यालय, तालुका पंचायत, मागासवर्गीय कल्याण खाते, फलोत्पादन खाते, ग्रंथालय, पॉलिटेक्निक विद्यार्थी वसतिगृह, काडा, सिटी सर्व्हे, भूमापन खाते, नगरविकास खाते, हवामान खाते, स्टॅस्टीकल विभाग, निवडणूक विभाग, धर्मदाय खाते, अन्न आणि नागरी पुरवठा, दिव्यांग कल्याण केंद्र आदी कार्यालये आहेत.

सदर सर्व कार्यालयांची सार्वजनिक बांधकाम खात्याकडून माहिती घेण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या कार्यालयांचे मोजमाप करण्यात आले आहे. त्यानुसार याठिकाणी असणाऱ्या 30 इमारती जमीनदोस्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. याबाबतचा सर्व अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे. इमारतींचे सर्वेक्षण करून छायाचित्रीकरण करण्यात आले आहे. याबरोबरच नुकतेच एरियल सर्वेक्षण करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.