महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; आरोपीला 3 वर्ष सश्रम कारावास

04:37 PM Dec 13, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

ओरोस । प्रतिनिधी

Advertisement

अल्पवयीन १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी रुपेश गोपाळ ढवण याला सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश गायकवाड यांनी भा . दं . वि. कलम 354 व पोक्सो कायदा कलम 8 अन्वये दोषी धरून 3 वर्ष सश्रम कारावास व रुपये 15 हजार दंड अशी शिक्षा सुनावली आहे . एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपी रुपेश गोपाळ ढवण याच्याविरोधात भा. द.वि कलम 354, पोक्सो कायदा कलम 8 नुसार कणकवली पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . त्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रूपाली गोरड यांनी केला होता.सदर खटल्यात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी सर्व साक्षीदार तपासून युक्तिवाद देखील केला होता.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गायकवाड यांनी आरोपीला भा .दं. वि. कलम 354 व पोक्सो कायदा कलम 8 अन्वये दोषी धरून 3 वर्ष सश्रम करावास व रुपये 15 हजार दंड अशी शिक्षा सुनावली आहे .

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # sindhudurg update # konkan update # news update # crime #
Next Article