घाटात संरक्षक कठडा बांधताना दरड कोसळून तीन कामगारांचा मृत्यू
11:09 AM Apr 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : शिमोगा जिल्ह्यातील कुंदापूर-शिमोगा मार्गावर हुलिकल घाटात रस्त्याच्या संरक्षक कठड्याचे बांधकाम सुरू असताना माती खचल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. राघवेंद्र (वय 37), राजू (वय 30) आणि शब्बीर (वय 40) अशी मृत कामगारांची नावे आहेत. घटनास्थळी होसनगर शहर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य हाती घेतले. हुलिकल घाटात वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावरील वळणावर संरक्षक कठडा निर्माण केला जात होता. काम सुरू असतानाच अचानक दरड कोसळली. त्यामुळे कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत चौघेजण जखमी झाले.
Advertisement
Advertisement