महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हिजबुल मुजाहिद्दीनच्या 3 दहशतवाद्यांना अटक

07:00 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 संशयितांमध्ये दोन पाकिस्तानी नागरिकांचाही समावेश

Advertisement

वृत्तसंस्था /लखनौ

Advertisement

उत्तर प्रदेश एसटीएफने दोन पाकिस्तानी नागरिकांसह तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे लोक आयएसआयच्या मदतीने भारतात दहशतवादी कारवाया करण्याची योजना आखत होते. काही पाकिस्तानी नागरिक गुप्तचर संस्था आयएसआयच्या मदतीने नेपाळ सीमेवरून भारतात प्रवेश करणार असल्याची माहिती काही दिवसांपासून मिळत होती. त्या अनुषंगाने सापळा रचून मोहम्मद अल्ताफ भट, मोहम्मद सय्यद, गुलाम अहमद अली अशा तिघांना अटक करण्यात आली आहे.  पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना भारतात कारवाया करण्याची योजना आखत असून त्यांनी आयएसआयच्या मदतीने हिजबुल मुजाहिद्दीनच्या प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षणही घेतले असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीनंतर दोन पाकिस्तानी व्यक्ती भारत-नेपाळ सीमेवर असलेल्या शेख फरेंडा या सीमावर्ती गावात गुप्त मार्गाने भारतात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली. 3 एप्रिल रोजी एटीएस फील्ड युनिट गोरखपूरने नेपाळ-भारत (सोनौली बॉर्डर) येथून तीन आरोपींना अटक केली. अटक केलेल्यांमधील अल्ताफने हिजबुल पॅम्पमध्ये शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेतल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article