महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा

07:00 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कुपवाडा येथे चकमक : माछिलमध्ये 2, तंगधारमध्ये एक घुसखोर ठार : राजौरीत दहशतवाद्यांचा शोध सुरू

Advertisement

वृत्तसंस्था /श्रीनगर

Advertisement

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये सैन्याने 3 दहशतवाद्यांना यमसदनी पाठविण्यात यश मिळविले आहे. यातील दोन दहशतवादी माछिल तर एक तंगधारमध्ये मारला गेला आहे. अद्याप मारले गेलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह हाती लागलेले नाहीत. माछिल आणि तंगधारमध्ये 28-29 ऑगस्टच्या रात्री उशिरा खराब हवामानादरम्यान संशयास्पद हालचाली दिसून आल्या. यानंतर तेथे सैन्य आणि पोलिसांकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली. यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याने सैन्याने प्रत्युत्तर दिले. अद्याप तेथे चकमक सुरू असल्याचे समजते. दोन्ही ठिकाणी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

तर राजौरी येथेही शोधमोहीम सुरू आहे. तेथे 2-3 दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. 28 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वाजता खेरी मोहरा लाठी आणि दांथल येथे शोधमोहीम सुरू करण्यात आली. शोधमोहिमेदरम्यान रात्री उशिरा सुमारे 11.45 वाजता दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

करना सेक्टर आणि माछिल सेक्टरच्या कुमकडीमध्ये घुसखोरी होण्याची शक्यता असल्याचे गुप्तचर यंत्रणेने सैन्याला कळविले होते. या इनपूटनंतर दोन्ही ठिकाणी सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी तुकड्या पाठविल्या होत्या. कुमकडी येथे संशयास्पद हालचाली दिसून आल्याने सुरक्षा दलांनी गोळीबार केला होता. तेथील चकमक गुरुवारी सकाळपर्यंत चालली आहे. अशाच प्रकारच्या संशयास्पद हालचाली करना सेक्टरमध्ये बुधवारी रात्री 9 वाजता दिसून आल्या. यानंतर सुरक्षा दलांनी गोळीबार करत घुसखोरी रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर राबविलेल्या शोधमोहिमेत कुमकडीमध्ये दोन तर करना येथे एक मृतदेह हाती लागला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article