चार दिवसात ४ अजगरांसह ३ सापांना जीवदान
सर्पमित्र नाविद हेरेकर यांच्यासह बाल सर्पमित्रांची कामगिरी
ओटवणे | प्रतिनिधी
सावंतवाडी येथील सर्पमित्र नाविद हेरेकर यानी दोन बाल सर्पमित्रांच्या सहकार्याने चार दिवसात ४ अजगरांसह एक नाग, एक धामण, एक मांडूल अशा सात सर्पांना जीवदान देत त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले. शनिवारी रात्री सावंतवाडी शहरातील बांदा नाका परिसरात भरवस्तीतील दहा फुटी महाकाय अजगराला नाविद हेरेकर यांनी त्यांचा विद्यार्थी पियुष निर्गुण याच्या सहकार्याने या अजगराला जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडले होते. रविवारी एक नाग, एक धामण, एक मांडूल अशा तीन सर्पांना पकडून जिवदान देताना त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले. सोमवारी रात्री खासकीलवाडा येथेही भरवस्तीत आठ फुटी अजगरालाही नाविद हेरेकर यांनी पियुष निर्गुण व कबिर हेरेकर यांच्या सहकार्याने पकडून जीवदान देत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. मंगळवारी रात्रीही सावंतवाडी शहरातील पोलिस लाईन परिसरात भरवस्तीतील सात फुटी अजगराला नाविद हेरेकर यांनी बाल सर्पमित्र कबिर हेरेकर याच्या सहकार्याने पकडून जीवदान देत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.सर्पमित्र नाविद हेरेकर यांनी यापूर्वीही सावंतवाडी परिसरातील अनेक अजगरांसह सापांना जीवदान देत त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. नाविद हेरेकर हे आपल्या हेरेकर क्लासिसच्या माध्यमातून मुलांचे केवळ शैक्षणिक नाही तर सामाजिक विकास देखील करत आहेत.