मोटोरोला रेझर 2026अंतर्गत 3 स्मार्टफोन्स सादर
रिलायन्सचे मूल्य सर्वाधिक वाढीत : सेन्सेक्स 249 अंकांनी होता वाढलेला
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
मोटोरोला कंपनीचे रेझर 2026 सिरीजअंतर्गत नव्या स्मार्टफोनचे लॉन्चिंग नुकतेच झाले आहे. मोटोरोला रेझर 2026 या सिरीज अंतर्गत कंपनीने रेझर अल्ट्रा 2026, रेसर प्लस 2026, रेझर 2026 असे तीन स्मार्टफोन्स सादर केले आहेत. या स्मार्टफोनचे जागतिक पातळीवर कंपनीने लॉन्चिंग केले आहे. सात रंगांच्या पर्यायासह आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसह सदरचे स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. अल्ट्रा आणि रेझर प्लस या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅप ड्रॅगन 8 सिरीज अंतर्गत ऑक्टा कोअर चिपसेट दिली गेली आहे. रेझर 2026 मध्ये मीडियाटेक प्रोसेसर दिला गेला आहे. अल्ट्रा आणि प्लस या स्मार्टफोन मध्ये चार इंचाचा मोठा कव्हर डिस्प्ले दिला गेला आहे.
किंमत किती
मोटोरोला रेझर अल्ट्राची किंमत साधारणपणे 1 लाख 43 हजार रुपये असणार आहे. हा फोल्डेबल फोन येणाऱ्या महिन्यांमध्ये युरोप, मध्य पूर्व देश, आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. रेझर प्लस व रेझर यांच्या अनुक्रमे किमती 1 लाख 5 हजार रुपये आणि 76 हजार रुपये इतक्या असणार आहेत.
डिस्प्ले स्क्रीन, बॅटरी
मोटोरोला रेझर अल्ट्राला सात इंचाचा अमोलेड फोल्डेबल डिस्प्ले दिला आहे. रेझर प्लस आणि रेझर 2026 यांना 6.9 इंचाची अमोलेड फोल्डेबल क्रीन असणार आहे. 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेजची व्यवस्था यामध्ये असणार आहे. 50 मेगापिक्सलचा कॅमेरा यामध्ये दिला जाणार आहे. रेझर प्लस आणि रेझर मध्ये मात्र 32 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात येणार आहे. रेझर अल्ट्रा मध्ये 5000 एमएएचची बॅटरा, रेझर प्लस मध्ये 4500 एमएएचची बॅटरी दिली जाणार आहे.