For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

3 नवे फौजदारी कायदे सध्या लागू करू नका!

06:38 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
3 नवे फौजदारी कायदे सध्या लागू करू नका
Advertisement

पंतप्रधान मोदींना ममता बॅनर्जींनी लिहिले पत्र

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे ममता बॅनर्जी यांनी नवे फौजदारी कायदे घाईगडबडीत संमत करण्यात आल्याचे म्हणत त्यांची अंमलबजावणी टाळण्याची मागणी केली आहे. हे तिन्ही कायदे 1 जुलैपासून लागू होणार आहेत.

Advertisement

नव्या फौजदारी कायद्यांची नव्याने संसदीय समीक्षा करण्याची गरज असल्याचे म्हणत ममता बॅनर्जी यांनी या तिन्ही कायद्यांवरून गंभीर चिंता व्यक्त केली आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा अधिनियम 2023 लवकरच लागू होणार आहेत.

संसदेत 146 खासदार निलंबित असताना संबंधित तिन्ही विधेयके लोकसभेत संमत झाली होती. मागील सराकरने या तीन महत्त्वपूर्ण विधेयकांना एकतर्फी आणि कुठल्याही चर्चेशिवाय संमत करविले होते. त्याच दिवशी लोकसभेच्या सुमारे 100 सदस्यांना निलंबित करण्यात आले होते आणि दोन्ही सभागृहांच्या एकूण 146 खासदारांना संसदेबाहेर काढण्यात आले होते. ही विधेयके हुकुमशाहीच्या पद्धतीने संमत करविण्यात आली होती. आता याप्रकरणी समीक्षा होण्याची गरज आहे. किमान या कायद्यांच्या अंमलबजावणीची तारीख पुढे ढकलण्यात यावी असे ममता बॅनर्जी यांनी पत्रात नमूद केले आहे.

नव्याने विचारविनिमयाची गरज

या महत्त्वपूर्ण कायदेशीर बदलांवर नव्याने विचारविनिमय व्हायला हवा आणि नव्या लोकसभेसमोर हे विषय मांडले जावेत. घाईगडबडीत संमत करण्यात आलेल्या नव्या कायद्यांवरून जाहीर स्वरुपात व्यक्त करण्यात आलेले व्यापक आक्षेप पाहता नव्याने निवडून आलेल्या आलेल्या लोकप्रतिनिधींना प्रस्तावित कायद्यांची समीक्षा करण्याची संधी मिळावी असे ममतांनी म्हटले आहे.

1 जुलैपासून होणार लागू

कुठल्याही दूरगामी कायदेशीर बदलाला योग्यपद्धतीने लागू करण्यापूर्वी काळजीपूर्वक तयारीची आवश्यकता असते. आमच्याकडे अशाप्रकारच्या अभ्यासाला टाळण्याचे कुठलेच कारण नाही. भारतीय न्याय संहिता, भारतीय पुरावा अधिनियम आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेची अंमलबजावणी टाळण्याच्या आमच्या आवाहनावर विचार करावा अशी नम्रतापूर्वक विनंती करत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. तिन्ही नवे फौजदारी कायदे एक जुलैपासून लागू होणार असल्याची माहिती केंद्रीय न्याय आणि कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली आहे.

Advertisement

.