For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोठी बातमी! मोपा विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत 3 जिवंत काडतुसे सापडली

09:04 AM Sep 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोठी बातमी  मोपा विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत 3 जिवंत काडतुसे सापडली
Advertisement

मोपा : मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान एका 33 वर्षीय प्रवाशाच्या बॅगेत 3 जिवंत काडतुसे आढळून आल्याने खळबळ उडाली. दिल्लीला जाणाऱ्या विमानाने प्रवास करण्याच्या तयारीत असलेल्या या प्रवाशाच्या सामानाची तपासणी करताना सुरक्षा यंत्रणेला ही काडतुसे आढळून आली.

Advertisement

संबंधित प्रवासी फरीदाबाद, हरियाणा येथील असल्याची माहिती मिळाली आहे. सुरक्षा तपासणीदरम्यान बॅगेत 3 जिवंत काडतुसे आढळल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने कारवाई केली. प्रवाशाकडे ही काडतुसे बाळगण्यासाठी किंवा विमानातून नेण्यासाठी आवश्यक वैध परवाना अथवा अधिकृत परवानगी नसल्याचे तपासात समोर आले.

या प्रकरणी शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून प्रवाशाला BNSS अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. काडतुसे त्याच्याकडे कशी आली आणि ती विमानतळापर्यंत कशी पोहोचली, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement

.