For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

या आठवड्यात 3 आयपीओ होणार गुंतवणुकीसाठी खुले

06:07 AM Mar 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
या आठवड्यात 3 आयपीओ होणार गुंतवणुकीसाठी खुले
Advertisement

सेडमॅक मेकॅट्रॉनिक्ससह एलफीन अॅग्रो, श्रीनिबास प्रधान आणणार आयपीओ

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय शेअर बाजारामध्ये 2 मार्चपासून सुरु होणाऱ्या आठवड्यामध्ये एकंदर तीन आयपीओ सादर होणार आहेत. त्यामध्ये एक मेन बोर्डावर तर अन्य दोन एसएमई प्लॅटफॉर्मवर सादर केले जाणार आहेत.

Advertisement

सेडमॅक मेकॅट्रॉनिक्सचा आयपीओ

याच दरम्यान या आठवड्यात नऊ कंपन्यांचे समभाग बाजारात सुचिबद्ध होणार आहेत. यामध्ये चार कंपन्या मेन बोर्डवरती सुचिबद्ध होतील. सेडमॅक मेकॅट्रॉनिक्स यांचा आयपीओ 4 मार्च रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 6 मार्चपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. समभागाची इशू किंमत 1287-1352 रु. प्रति समभाग अशी निश्चित केली आहे. 11 समभागांसाठी एका लॉटमध्ये पैसे गुंतविता येणार आहेत.  बीएसई आणि एनएसईवर 11 मार्च रोजी कंपनीचे समभाग सूचिबद्ध होऊ शकतात. सदरच्या आयपीओतून कंपनी 1087 कोटी रु. उभारणार आहे.

एलफीन अॅग्रो, श्रीनिबास प्रधान यांचे येणार आयपीओ

एलफीन अॅग्रो इंडिया यांचा आयपीओ 25 कोटी रुपयांचा असणार असून 5 मार्च रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 9 मार्चला गुंतवणुकीसाठी आयपीओ बंद होणार असून समभागाची इशू किंमत 47 रु. प्रति समभाग अशी निश्चित करण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 3000 समभागांचा समावेश असणार आहे. बीएसई एसएमईवर समभाग 12 मार्च रोजी सूचिबद्ध होण्याची शक्यता आहे. श्रीनिबास प्रधान कन्स्ट्रक्शन यांचा आयपीओ 6 मार्चला खुला होऊन 10 मार्चला बंद होईल. 20 कोटी रुपयांचा हा आयपीओ असणार असून 91 ते 98 रु. प्रति समभाग अशी इशू किंमत असणार आहे. 1200 समभागांसाठी गुंतवणूकदारांना बोली लावता येणार आहे. एनएसई एसएमईवर समभाग 13 मार्चला सूचिबद्ध होऊ शकतो.

यापूर्वी 27 फेब्रुवारीला एसटेक ई-कॉमर्स यांचा आयपीओ खुला झाला होता. जो 4 मार्च रोजी बंद होणार आहे. 48 कोटी रुपये कंपनी उभारणार असून आयपीओला आतापर्यंत 26 टक्के सबस्क्रिप्शन प्राप्त झाले आहे. 106 ते 112 रु. प्रति समभाग अशी समभागाची किंमत असणार आहे. 9 मार्च रोजी समभाग सूचिबद्ध होणार आहेत. याचप्रमाणे स्ट्राइडर्स इम्पेक्स यांचा आयपीओ 26 ला खुला झाला होता जो 2 मार्चला बंद होणार आहे. 71 ते 72 रु. समभागाची किंमत असेल.

यांचे समभाग होणार सुचीबद्ध

दुसरीकडे 2 मार्च रोजी श्रीराम ट्विशस्टेक्स व क्लिनमॅक्स एनवायरो एनर्जी सोलुशन्स यांचे समभाग सूचिबद्ध झाले आहेत. याच दिवशी कियासा रिटेल, अकॉर्ड ट्रान्सफॉर्मर आणि स्विच गिअर व मोबिलाईज अॅप हे समभाग सूचिबद्ध होणार आहेत. 4 मार्चला पीएनजी रेवा डायमंड ज्वेलरी व 5 मार्च रोजी ओमनीटेक इंजिनिअरिंग यांचे समभाग सूचिबद्ध होतील. याच दिवशी याप डिजिटल यांचे समभाग तर 6 मार्चला स्ट्राइडर्स इम्पेक्स यांचे समभाग सूचिबद्ध होतील.

Advertisement
Tags :

.