महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

या आठवड्यात शेअरबाजारात येणार 3 आयपीओ

06:23 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्लॅटिनम इंडस्ट्रिज, अॅक्सीकॉम टेलिसिस्टम्स व भारत हायवेजचा समावेश

Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisement

येत्या आठवड्यामध्ये तीन कंपन्यांचे आयपीओ भारतीय शेअर बाजारामध्ये दाखल होणार आहेत. प्लॅटिनम इंडस्ट्रीज लिमीटेड, अॅक्सीकॉम टेलिसिस्टीम्स लिमीटेड आणि भारत हायवेज इनव्हीट या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे.

3 कंपन्यांनी शेअरबाजारात आगमन करण्याचे निश्चित केले आहे. प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव अर्थात आयपीओअंतर्गत तीनही कंपन्या मिळून एकंदर अंदाजे 3 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम उभारली जाणार आहे. पाहुया याविषयी

सविस्तर-

प्लॅटिनम इंडस्ट्रीज लिमिटेड

प्लॅटिनम इंडस्ट्रीज ही कंपनी आयपीओद्वारे 235 कोटी रुपये उभारणार असून 27 फेब्रुवारी रोजी आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 29 फेब्रुवारीपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. एनएसई आणि बीएसईवर कंपनीचा समभाग 5 मार्चला सूचीबद्ध होणार आहे. समभागाची इश्यु किंमत 162-171 रुपये प्रति समभाग अशी निश्चित करण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 87 समभाग समाविष्ट असणार असून याकरिता गुंतवणूकदारांना 14887 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

अॅक्सिकॉम टेलिसिस्टीम्स लिमिटेड

अॅक्सिकॉम कंपनीचा आयपीओ 27 ते 29 फेब्रुवारीदरम्यान बोली लावण्यासाठी खुला होणार आहे. 5 मार्चला कंपनीचा समभाग दोन्ही बाजारात सूचीबद्ध होणार आहे. या आयपीओ अंतर्गत 429 कोटी रुपये उभारले जाणार आहेत. 135-142 रुपये प्रतिसमभाग अशी समभागाची इश्यु किंमत निश्चित करण्यात आली आहे. रिटेल गुंतवणूकदारांना एका लॉट अंतर्गत 100 समभाग खरेदी करावे लागणार आहेत. कमीतकमी 14200 रुपये गुंतवावे लागणार आहेत.

भारत हायवेज इनव्हीट

बाजारातील आणखी एक कंपनी भारत हायवेज आपला आयपीओ 28 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत बाजारात खुला करणार आहे. 2500 कोटी रुपयांची उभारणी आयपीओअंतर्गत केली जाणार असून 6 मार्चला दोन्ही बाजारामध्ये समभाग लिस्ट होणार आहे. 98-100 रुपये प्रति समभाग अशी इश्यू किंमत कंपनीने निश्चित केली आहे. एका लॉटसाठी गुंतवणूकदारांना किमान 15 हजार रुपये गुंतवावे लागणार आहेत. यामध्ये 150 समभाग असतील.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article