महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हिमाचलात 3 अपक्षांचा भाजपप्रवेश

06:10 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / सिमला

Advertisement

हिमाचल प्रदेशात 3 अपक्ष आमदारांनी विधानसभेचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी शुक्रवारी सकाळी आपले राजीनामे विधानसभा सचिवांकडे सोपविले आणि नंतर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा केली. आशीश शर्मा, होशियार सिंग आणि एल. के. ठाकूर अशी या आमदारांची नावे आहेत. ते अनुक्रमे हमीरपूर, डेहरा आणि नालागढ या मतदारसंघांमधून निवडून आले होते. राज्यात काँग्रेस सरकारची स्थापना झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस सरकारला समर्थन दिले होते. त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे आता पक्षांतर्गत बंडखोरी सहन करणाऱ्या काँग्रेसचे बळ आणखी कमी झाले आहे.

Advertisement

गेल्या महिन्यात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी बंडखोरी करून आपल्याच पक्षाचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांच्या विरोधात मतदान केले होते. त्यामुळे विधानसभेत काँग्रेसचे बहुमत असून आणि राज्यसभेची एकच जागा असूनही काँग्रेसला सहज हाती लागू शकणारा विजय गमवावा लागला होता आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने ती निवडणूक जिंकली होती.

सहा आमदार ठरले अपात्र

बंडखोरी केलेल्या सहा आमदारांना विधानसभेच्या अध्यक्षांनी अपात्र घोषित केले होते. या आमदारांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. तथापि, न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचा निर्णय योग्य ठरविला होता. परिणामी, काँग्रेसच्या बहुमताचे प्रमाण कमी झाले होते. 68 सदस्यांच्या हिमाचल प्रदेश विधानसभेत काँग्रेसचे 40, भारतीय जनता पक्षाचे 25 आणि अपक्ष 3 असे पक्षीय बलाबल होते. आता काँग्रेसचे 34 आणि भारतीय जनता पक्षाचे 25 आमदार उरले असून 9 जागा रिक्त आहेत. रिक्त स्थानी कदाचित लोकसभा निवडणुकीसह पोटनिवडणुका होण्याची शक्यता आहे. या सर्व पोटनिवडणुका भारतीय जनता पक्षाने जिंकल्यास दोन्ही पक्षांची आमदारसंख्या समसमान होऊन नवा पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो. तथापि, काँग्रेसने स्वत:मध्ये आणखी फाटाफूट होऊ दिली नाही आणि या नऊपैकी एक जागा जरी जिंकली तरी सरकार वाचू शकते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article