For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मालवण समुद्रात ३ अनधिकृत मासेमारी ट्रॉलर्स पकडले

11:47 AM Sep 09, 2025 IST | अनुजा कुडतरकर
मालवण समुद्रात ३ अनधिकृत मासेमारी ट्रॉलर्स  पकडले
Advertisement

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय,सिंधुदुर्ग यांची धडक कारवाई ; तीनही नौका रत्नागिरीतील

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

मालवण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरील अंदाजे ६ ते ७ सागरी मैल येथे बेकायदेशीररीत्या मासेमारी करण्याऱ्या रत्नागिरी येथील ३ मच्छिमार ट्रॉलर्सवर सोमवार ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने ही धडक कारवाई करण्यात आली आहे.सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी गणेश टेमकर, मालवण पोलिस ठाणे येथील पोलिस कर्मचारी कुंडलिक वानोळे तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक मालवण व देवगड यांचे सहकार्याने हे रत्नागिरी येथील असलेल्या पर्ससीन नौका सफा मारवा ३ नों. क्र.- IND-MH-४-MM-५२६२, नौका राबिया अब्दुल लतिफ नों. क्र.- IND-MH-४-MM-५२००, व नौका जलसफा २ नों. क्र.- IND-MH-४-MM-६००५ हे तीन ट्रॉलर्स पकडून ताब्यात घेतले आहेत .पकडण्यात आलेल्या ट्रॉलर्सवर बांगडा व मासळी आढळून आली आहे. या तिन्ही नौकांवर नौका तांडेलसह एकूण ५५ ते ६५ खलाशी आहेत.सदर नौका जप्त करून आनंदवाडी, देवगड बंदरात ठेवण्यात आल्या आहेत. नौकेवर असणाऱ्या मासळीचा लिलाव ९ सप्टेंबर रोजी सकाळी करण्यात येत आहे. सदर नौकांना लाखों रुपये दंड होण्याची शक्यता आहे.आठवड्याभरापूर्वी राज्याचे मत्स्य व्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत मच्छीमारी करणाऱ्या ट्रॉलर्सवर कारवाई करा असे आदेश दिल्यानंतरही सिंधुदुर्गच्या समुद्रात बेकायदेशीर पर्ससीन मच्छीमारी करणाऱ्या ट्रॉलर्सचा धुमाकूळ सुरू राहिल्याने संतप्त बनलेल्या पारंपरिक मच्छीमारांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी ही कारवाई केली. दरम्यान , पारंपरिक मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी मालवणच्या समुद्रात बेकायदेशीर पर्ससीन मच्छिमारी सुरु असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.