For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आत्महत्येस प्रवृत्त करणारे ३ फरार संशयित सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात

04:50 PM Sep 10, 2024 IST | अनुजा कुडतरकर
आत्महत्येस प्रवृत्त करणारे ३ फरार संशयित सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात
Advertisement

चार दिवसांची पोलीस कोठडी ; ८ संशयित अद्याप फरारच

Advertisement

सावंतवाडी -

सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील अक्षय साईल या युवकास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या ११ फरार संशयितांपैकी तिघांना सावंतवाडी पोलिसांनी काल अटक केली . अजित बाळकृष्ण मठकर , संकेत रत्नाकर माळी ( रा . सावंतवाडी ) आणि श्यामू उर्फ शरद राजन साळगावकर रा . माजगाव , सावंतवाडी अशी या संशयितांची नावे आहेत . या तिघांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. वेदिका राऊळ यांनी काम पाहिले . या गुन्ह्यातील अद्यापही ८ संशयित फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत अशी माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली .

Advertisement

Advertisement
Tags :

.