कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

3 कोटी वेतन, तरीही लोक नाइच्छुक

06:20 AM Apr 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रत्येक जण कठोर मेहनत करूनही चांगली नोकरी मिळत नसल्याचे चित्र आहे. अनेक लोकांना स्वत:च्या पात्रतेपेक्षा कमी दर्जाची नोकरी करावी लागते. परंतु कुणी चांगली नोकरी सोडू इच्छितो का? सध्या एका नोकरीची चर्चा असून ती ऑस्ट्रेलियात मिळत आहे. या नोकरीसाठी वर्षाला 3 कोटी रुपयांचे वेतन तसेच राहण्यासाठी मोफत घर मिळेल. चालविण्यासाठी कार देखील मिळणार आहे, परंतु तरीही ही नोकरी करण्यास कुणीच तयार नाही.

Advertisement

Advertisement

ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड क्षेत्रात एक छोटे शहर असून याचे नाव जूलिया क्रीक आहे. येथे एका नोकरीसाठी वेतनाच्या स्वरुपात 4.28 लाख डॉलर्स (सुमारे 3 कोटी रुपये) दिले जाणार आहेत. तसेच मोफत घर अन् कारही मिळणार आहे. तरीही लोक ही नोकरी करू इच्छित नाहीत. या नोकरीसाठी लोकांना या छोट्या शहरात रहावे लागणार आहे.

अत्यंत दूर आहे शहर

ही नोकरी एका स्थानिक फॅमिली डॉक्टरची आहे, या छोट्या ग्रामीण शहरात वीज अन् इंटरनेट सुविधा आहे, परंतु हे शहर मुख्य नागरी वस्तीपासून कित्येक मैल दूर आहे. येथून क्वीन्सलँडची राजधानी ब्रिस्बेनपर्यंत जाण्यासाठी कारने 17 तासांचा कालावधी लागतो. सर्वात नजीकचे शहर टाउन्सविले असून ते 7 तासांच्या अंतरावर आहे. शहर अत्यंत दुर्गम असल्याने येथे डॉक्टरांना दुप्पट वेतन देण्याची तयारी आहे.

शांत जीवनाची संधी

येथे नोकरी करणाऱ्या व्यक्तीला सोपे, धावपळ नसलेले जीवन जगण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी डॉ. एडम लुइस येथे कार्यरत होते, परंतु ते आता ब्रिस्बेन सारख्या मोठ्या शहरात गेले आहेत. जेव्हा मी येथे होतो, तेव्हा एकटे जगणे शिकलो होतो, मी एकटाच लोकांवर उपचार करायचो असे ते सांगतात. एडम यांच्यापूर्वी या शहरात 15 वर्षांपूर्वी डॉक्टर होता. जूलिया क्रीक येथील लाइफस्टाइल चांगली आहे, मागील डॉक्टरचा 2 वर्षांचा करार संपुष्टात आला आहे आणि आता तो परिवारासोबत ब्रिस्बेनमध्ये परतला असल्याचे महापौराने सांगितले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article