गो फर्स्ट घेण्यासाठी 3 कंपन्यांची स्पर्धा
नवी दिल्ली :
आर्थिक तंगीच्या पार्श्वभूमीवर हवाई क्षेत्रातील कंपनी गो फर्स्टची खरेदी करण्यासाठी सध्याला 3 कंपन्यांनी इच्छा वर्तवली असल्याचे पाहायला मिळते आहे. सदरच्या कंपनीवर 6521 कोटी रुपयांचे कर्ज आहे. सदरच्या गो फर्स्टची खरेदी करण्यासाठी हवाई क्षेत्रातील स्पाइसजेट, आफ्रिकेतील सॅफ्रीक इन्वेस्टमेंटस आणि शारजातील एव्हिएशन कंपनी स्कायवन इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. गो फर्स्टकरीता बोली लावण्यासाठीची मुदत तिन्ही कंपन्यांनी वाढवून मागितली आहे. यासंदर्भात आगामी काही दिवसात निर्णय होण्याची अपेक्षा आहे. गो फर्स्ट खरेदी करण्यासाठीच्या बोलीकरीता 22 नोव्हेंबर 2023 ही शेवटची तारीख होती. पण तोपर्यंत कोणत्याही कंपनीने गो फर्स्ट खरेदीसाठी बोली लावली नव्हती. आता सदरच्या वरील 3 कंपन्यांनी खरेदीकरीता रस दाखवल्याचे कळते. एअरलाइन कंपनीवर 6521 कोटी रुपयांचे कर्ज आहे. सदरच्या कंपनीने साधारणपणे 3 मेपासूनच यंदा आपल्या विमानफेऱ्या रद्द केल्या आहेत.